अबू धाबीत पहिल्या ड्रायव्हरलेस एअर टॅक्सीची यशस्वी चाचणी
अबुधाबी , 6 जुलै (हिं.स.)।अबूधाबीने शहर वाहतुकीत क्रांती घडविणाऱ्या पहिल्या ड्रायव्हरलेस (स्वयंचलित) इलेक्ट्रिक एअर टॅक्सीच्या यशस्वी चाचणी उड्डाणाची घोषणा केली आहे.ही सेवा 2026 च्या सुरुवातीस सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात
Electric taxi


अबुधाबी , 6 जुलै (हिं.स.)।अबूधाबीने शहर वाहतुकीत क्रांती घडविणाऱ्या पहिल्या ड्रायव्हरलेस (स्वयंचलित) इलेक्ट्रिक एअर टॅक्सीच्या यशस्वी चाचणी उड्डाणाची घोषणा केली आहे.ही सेवा 2026 च्या सुरुवातीस सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.अमेरिकास्थित आर्चर एव्हिएशन या कंपनीने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली असून, अबूधाबी हे त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय प्रक्षेपण स्थळ ठरणार आहे.

या एअर टॅक्सीचे चाचणी उड्डाण अबूधाबीतील अल बतीन एक्झिक्युटिव्ह एअरपोर्ट येथे पार पडले. चाचणीदरम्यान मिडनाईट इवीटीओएल (इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग) हे पूर्णपणे विजेवर चालणारे आणि शून्य प्रदूषण करणारे विमान शहराच्या आकाशात उडताना दिसले.

अहवालानुसार, या चाचण्या विशेषतः युएईतील उष्ण हवामान, जास्त आर्द्रता आणि धूळ यासारख्या परिस्थितींमध्ये पार पडणार आहेत.ही टॅक्सी विशेषतः शहरांतील अल्प पल्ल्याच्या प्रवासासाठी म्हणजे विमानतळ ते शहराचे केंद्र अशी वाहतूक सोपी करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे.

ही सेवा केवळ श्रीमंत किंवा लक्झरी प्रवाशांसाठी नाही, तर सामान्य जनतेसाठीही किफायतशीर दरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यात एअर टॅक्सी ही सामान्य शहरवासीयांसाठीही एक व्यवहार्य पर्याय ठरू शकते. ही टॅक्सी रस्त्यांवरील गर्दी कमी करेल, प्रवासाचा कालावधी घटवेल आणि पारंपरिक वाहनांपेक्षा अधिक शांत व पर्यावरणपूरक असेल. याशिवाय, भविष्यात अशा इवीटीओएलएस चा वापर शोध व बचाव मोहीमांमध्ये करण्याची शक्यता आहे.दुर्गम भागात पारंपरिक हेलिकॉप्टर पोहोचू शकत नाहीत, तेथे ही टॅक्सी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

दरम्यान, अबूधाबीच्या या यशापूर्वी दुबईमध्ये जॉबी एव्हिएशन या कंपनीने ३० जून रोजी अशाच प्रकारच्या एअर टॅक्सीचे यशस्वी चाचणी उड्डाण केले होते. दोन्ही सेवा २०२६च्या सुरुवातीला व्यावसायिक स्वरूपात सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande