छ. संभाजीनगर : वाळुजमध्ये 12 लाख 45 हजार रुपयांचा अमली पदार्थाचा मोठा साठा जप्त
छत्रपती संभाजीनगर, 14 सप्टेंबर (हिं.स.)।वाळुज येथून 12 लाख 45 हजार रुपयांचा अमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करून सहा आरोपींना अटक करण्यात आली.आणि उर्वरित 41 आरोपींच्या शोधात पोलीस असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल आणि माकोका अंतर्गत कार्यवाही करण्य
अ


छत्रपती संभाजीनगर, 14 सप्टेंबर (हिं.स.)।वाळुज येथून 12 लाख 45 हजार रुपयांचा अमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करून सहा आरोपींना अटक करण्यात आली.आणि उर्वरित 41 आरोपींच्या शोधात पोलीस असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल आणि माकोका अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल असे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.

औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी शहरातील अमली पदार्थ विक्री व विविध गुन्हेगारी कृत्यांविरोधात उचललेले ठोस पाऊल समाजासाठी दिलासा ठरत आहे. दररोज घेतला जाणारा ठाम पवित्रा आणि गुन्हेगारीविरोधातील कठोर कारवाई यामुळे नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाबद्दल विश्वास अधिक दृढ होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande