नाशिक, 17 सप्टेंबर (हिं.स.) भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी संपुर्ण देशात सेवा पंधरवडयाचे आयोजन करत आहेत. त्याचाच भाग म्हणून नाशिक महानगरात दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान विविध सेवा उपक्रम जसे की आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी, स्वच्छता अभियान, पंतप्रधान यांच्या जीवनावर आधारीत प्रदर्शनी तसेच त्यांच्या जीवनावर आधारीत पुस्तकांचे वितरण, दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, एक पेड मां के नाम वृक्षारोपन, वोकल फॉर लोकल प्रचार व प्रसार, स्वदेशीचा प्रसार, विकसीत भारत चित्रकला स्पर्धा, युवा मोर्चाच्या नेतृत्वात नमो युवा मॅरेथॉन, विकसित भारत आत्मनिर्भर भारत अशा प्रकारचे भरगच्च कार्यक्रम भाजपा नाशिक महानगर जिल्हयाच्यावतीने राबविण्यात येणार आहेत असे भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार यांनी भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे आयोजित रक्तदान शिबीराप्रसंगी सांगितले.
यावेळी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य ना. गिरीष महाजन यांनी भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे आयोजित रक्तदान शिबीरास सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देतांना सांगितले की विकसित भारताचे मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे तसेच त्यांचे स्वाथ्य उत्तम रहावे, त्यांच्या नेतृत्वात भारताला नविन दिशा मिळावी व त्यांचा आत्मनिर्भर भारताचा मंत्र देशाला विश्वगुरु बनवो अशा शुभेच्छा दिल्या.
भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार, आ.प्रा.देवयानी फरांदे, आ.ॲड.राहुल ढिकले, विजय साने, लक्ष्मण सावजी ,महेश हीरे,सरचिटणीस सुनिल देसाई, अमित घुगे, ॲड.श्याम बडोदे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV