लातूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)। आज लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी
शासकीय विश्रामगृह, लातूर येथे बैठक घेतली. लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत शासकीय यंत्रणांसमवेत बैठक घेतली. नुकसानीचा आढावा घेवून तातडीने पंचनामे तसेच आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
लातूर जिल्ह्यातील गोधन खरेदी विक्री व वाहतुकीबाबतही महत्वपूर्ण बैठक झाली.
यावेळी आमदार अभिमन्यू पवार, श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis