सोलापूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)नवीन व नवीकरणीयऊर्जामंत्रालय, नवीदिल्ली (MNRE) यांच्यामार्फत दि. २२ जुलै, २०१९ रोजी पी-एम कुसुम योजना निर्गमित केली. राज्य शासनाने दि.१२ मे. २०२१ रोजी पीएम-कुसुम योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. या मध्ये शेतक-यांना दिवसा सिचंन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतक-यांना कृषीवापरासाठी पारेषण विरहीत सौर कृषी पंप अनुदान तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या योजने अंतर्गत ३ HP. ५ HP व ७.५ HP क्षमतेचे सौर कृषी पंप ९० ते ९५ टक्के अनुदानावर उपलब्ध असल्याचे विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी कळविले आहे.
नवीन अर्ज नोंदणी करणे करिता महाऊर्जा संकेतस्थळ -https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
Beneficiary Login करिता संकेतस्थळ- https://kusum.mahaurja.com/beneficiary/
सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतक-यास १० टक्के आणि अनुसुचित जाती अनुसूचितजमाती प्रवर्गातील शेतक-यास ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा SMS पाठविला जातो. राज्य शासनाने या योजनेसाठी महाऊर्जास २ लाख ८० हजार सौर कृषी पंपासाठी मान्यता दिली. सदर मान्यते नुसार महाऊर्जामार्फत लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय उदिदष्ट निश्चित करण्यात आले. महाऊर्जामार्फत सदयस्थितीत सोलापूर जिल्ह्यामध्ये सुमारे ७ हजार 425 सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड