त्र्यंबकेश्वर मध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन
त्रंबकेश्वर , 17 सप्टेंबर (हिं.स.)। त्र्यंबकेश्वर रस्त्याची गंभीर अवस्था लक्षात घेऊन अनेक अपघात झाले त्यामध्ये अनेकांचे मृत्यू झाला त्यामुळे सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्राद्ध घालून अनोख आंदोलन करण्यात आले‌. त्र्यंबकेश
त्र्यंबकेश्वर मध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन


त्रंबकेश्वर , 17 सप्टेंबर (हिं.स.)। त्र्यंबकेश्वर रस्त्याची गंभीर अवस्था लक्षात घेऊन अनेक अपघात झाले त्यामध्ये अनेकांचे मृत्यू झाला त्यामुळे सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्राद्ध घालून अनोख आंदोलन करण्यात आले‌.

त्र्यंबकेश्वर मध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले पितृपक्ष काळात नाशिक त्रंबकेश्वर हायवेवर मृत्युमुखी पडलेल्या सामूहिक कावघास व पूजन करून प्रशासन अधिकारी यांचे लक्ष वेधले रस्त्याची दुरवस्था झाली आहे ! 2 ते 3 वर्षांत जवळपास 35 हून अधिक जीव गेले व 150 अपघात या रस्त्यावर झाले तरी प्रशासन झोपलेले!

नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत तब्बल ३० ते ३५ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तरीही प्रशासनाला जाग येताना दिसत नाही. या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी काल सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून रस्त्याची बिकट अवस्था समोर आणली.

आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने व त्र्यंबकेश्वर मधील युवकांतर्फे त्र्यंबकेश्वर येथे एक अनोखे आंदोलन करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या लोकांना सामूहिक काव घास कार्यक्रम घेण्यात आला आणि रस्त्यांवरील खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेपर्वाईवर आता प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. हिमांशू देवरे ,विराज मुळे, पृथ्वी शिरसाट, कल्पेश कदम ,गौरव वाघ ,जयेश मेढे ,रोनीत भोसले, अंकुश काळे, रोहित मिंदे, ओमकार शिरसाठ, पवन कदम, कौस्तुभ सोनवणे ,योगेश भांगरे, आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande