सोलापूर - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद अभ्यागतांना भेटणार
सोलापूर, 17 सप्टेंबर, (हिं.स.)। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे नियमितपणे प्रत्येक आठवड्याला सोमवार व शुक्रवारी दुपारी 4.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभ्यागतांना भेटत असतात. परंतु जिल्ह्यातील काही नागरिकांना जिल्हाधिकारी यां
सोलापूर - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद अभ्यागतांना भेटणार


सोलापूर, 17 सप्टेंबर, (हिं.स.)। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे नियमितपणे प्रत्येक आठवड्याला सोमवार व शुक्रवारी दुपारी 4.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभ्यागतांना भेटत असतात. परंतु जिल्ह्यातील काही नागरिकांना जिल्हाधिकारी यांच्या भेटीच्या वेळा माहीत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.

जिल्हाधिकारी महोदय हे नेहमीप्रमाणेच प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी व शुक्रवारी सर्वसामान्य नागरिकांना दुपारी 4.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत त्यांच्या अडीअडचणीच्या अनुषंगाने भेट देतील. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande