सोलापूर, 17 सप्टेंबर, (हिं.स.)। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार ३७९ गावातील १.५४ लाख शेतकऱ्यांच्या १ लाख ३३ हजार हेक्टरवरील झाले आहे. प्रत्येक तालुक्यात पंचनामे करण्याचे काम सुरू असून नुकसानीची अंतिम आकडेवारी येण्यास आणखी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.
ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी ५९ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये ५९ हजार ११० शेतकऱ्यांचे ५६ हजार ९६१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. यामध्ये उत्तर सोलापूर २६ कोटी ०३ लाख, दक्षिण सोलापूर ११ कोटी ९९ लाख, अक्कलकोट १४ कोटी ०४ लाख, माढा १ कोटी ५९ लाख, पंढरपूर ४ कोटी ७० लाख, बार्शी ८.१८ लाख, अपर मंद्रूप १३.९९ लाख, मोहोळ १७.७३ लाख, मंगळवेढा १२.५४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड