अमरावती, 17 सप्टेंबर (हिं.स.)। युवक काँग्रेसच्या वतीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. स्थानिक पंचवटी चौकात पकोडे तळून सरकारच्या रोजगार धोरणांचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व वैभव वानखडे यांनी केले.
युवकांनी हातात डिग्री घेऊन “पकोडेवाले पीएम धन्यवाद!” अशा घोषणा देत रोजगाराच्या मागणीसाठी आवाज उठवला. अनेकांनी शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. आंदोलनात सहभागी युवकांनी केंद्र सरकारच्या रोजगाराच्या अपयशी धोरणांवर कठोर टीका केली.यावेळी मोठ्या संख्येने युवकांची उपस्थिती होती आणि त्यांनी शांततापूर्ण मार्गाने आपला रोष व्यक्त केला.या आंदोलनात अमरावती विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख, शहरजिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय साबळे, निखिल बिजवे, शिवानी पारधी, एड.अफरोज खान, एनएसयुआय शहराध्यक्ष संकेत साहू, सौरभ तायडे, चैतन्य गायकवाड, धनंजय बोबडे, सुजल इंगळे, साहिल वानरे ,निशांत पवार, सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी