मराठवाड्यातला पाऊस ओसरला , पूरस्थिती कायम
छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।सध्या मराठवाड्यातला पाऊस जरी ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत. मराठवाड्याची जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला पूर आला आहे. मराठवाड
अ


छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।सध्या मराठवाड्यातला पाऊस जरी ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत. मराठवाड्याची जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला पूर आला आहे.

मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्याला मुसळधार पावसानेअक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित विभागात आज देखील पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे अंदाज आहे. तर दुसरीकडे अद्याप बहुतांश ठिकाणी पावसाची रीपरीप सुरूच असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान केले आहे शेतजमिनी खरडून गेले आहेत

विशेष म्हणजे2006 नंतर प्रथमच जवळपास तीन लाख क्युसेक्स एवढा विसर्ग जायकवाडी धरणातून करण्यात आला. त्यामुळे पैठण शहरात पाणी घुसले.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जवळपास दहा हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. पैठण तालुक्यातील ही अनेक लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले..परभणी, नांदेड मध्ये ही गोदाकाटची स्थिती अशीच आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande