इंडिगो विमानात प्रवासी आणि क्रू मेंबरमध्ये वाद
दिल्ली-कोलकाता फ्लाईटमध्ये घडला प्रकार नवी दिल्ली,03 सप्टेंबर (हिं.स.): दिल्लीहून कोलकाताकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये (फ्लाइट क्रमांक अस्पष्ट) मंगळवारी एक गंभीर वाद घडला. एका प्रवाशाने विमानात धार्मिक नारे दिल्याचा आणि मद्यसेवन केल्याचा आरोप
इंडिगो फ्लाईट लोगो


दिल्ली-कोलकाता फ्लाईटमध्ये घडला प्रकार

नवी दिल्ली,03 सप्टेंबर (हिं.स.): दिल्लीहून कोलकाताकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये (फ्लाइट क्रमांक अस्पष्ट) मंगळवारी एक गंभीर वाद घडला. एका प्रवाशाने विमानात धार्मिक नारे दिल्याचा आणि मद्यसेवन केल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित प्रवाशाने क्रू मेंबर्सकडून छळ केल्याचा दावा केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित प्रवासी सीट क्रमांक 31-डी वर बसलेला होता आणि तो पेशाने वकील आहे. विमान काही ऑपरेशनल कारणांमुळे जवळपास 3 तास दिल्ली विमानतळावर थांबले होते. उड्डाणानंतर काही वेळातच प्रवाशाने “हर हर महादेव” असे धार्मिक नारे लावले आणि इतर प्रवाशांनाही त्यात सामील होण्याचे आवाहन केले. यावेळी तो एका सॉफ्ट ड्रिंकचा वापर करत होता, ज्यामधून दारूचा वास आल्याचे क्रू मेंबर्सनी सांगितले.

क्रू मेंबर्सने जेव्हा त्याच्याशी चौकशी केली, तेव्हा त्याने त्या बाटलीला लपवत लगेचच प्यायल्याचा आरोप आहे. यानंतर फ्लाइटमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.

यासंदर्भात विमान सेविकेने त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.

दुसरीकडे, प्रवाशाने या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याने कोणताही धार्मिक हेतू न ठेवता “हर हर महादेव” म्हटले आणि त्याबद्दल क्रू मेंबर्सकडून त्याचा छळ करण्यात आला. तसेच, त्याने उड्डाणाच्या आधी दिल्ली विमानतळावर बीयर घेतल्याचे मान्य करत त्याचा बिल पुरावा म्हणून सादर केले.विवादाचा कळस कोलकातामध्ये विमान लँड झाल्यानंतर झाला, जेव्हा प्रवाशाला सुरक्षादलांच्या हवाली करण्यात आले. सध्या क्रू मेंबर्स आणि प्रवाशाच्या तक्रारीच्या आधारे संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande