
लातूर, 3 सप्टेंबर (हिं.स.)। श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर, राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर, एसव्हीएसएस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, लातूर कॉलेज ऑफ सायन्स, एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ नर्सिंग या महाविद्यालयामध्ये विविध अधिकाऱ्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.
आरतीचे मानकरी बळीराम मेरवाड सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन लातूर, अमित दानवे प्रशासकीय अधिकारी अन्न व औषध प्रशासन छत्रपती संभाजी नगर विभाग, डॉ. स्वामी विनोद व डॉ.गीतांजली स्वामी यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जय घोषाने संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे,प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुमरेला,प्राचार्य डॉ वीरेंद्र मेश्राम आदी सर्व युनिटचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis