
सोलापूर, 3 सप्टेंबर (हिं.स.) : माळशिरस येथील शेतकरी दीपक श्रीमंत गोरड यांच्या गट नंबर 246 या दीड एकर क्षेत्रामध्ये शेतीला दिवसा पाणी देता यावे. म्हणून विहिरीवर बसवलेला सोलरपंपच्या प्लेटा अज्ञात चोरट्याने काढून नेल्या आहेत. यामुळे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अज्ञात चोरट्याने सोलरच्या 90 हजार रुपये किंमतीच्या 9 प्लेटा चोरून नेल्याने नुकसान झाले आहे. अशा चोरट्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड