पोटे पाटील एज्युकेशन ग्रुपने दिला मदतीचा हात अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यात समाज सेवेत नेहमी भरीव योगदान देणारे तसेच गरजूंना नेहमी मदत करण्यास तत्पर असणारे प्रवीण पोटे पाटील यांचा समाजसेवे प्रति मदतीचा वारसा पुढे चालवत पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप चे उपाध्यक्ष श्रेयश पोटे पाटील आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीने पंजाबमधील विनाशकारी पुरामुळे बाधित नागरिकांना मदत करण्यासाठी मानवता आणि सेवेचे एक अनोखे उदाहरण ठेवले आहे. आज पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप चे उपाध्यक्ष श्रेयशदादा पोटे पाटील यांनी अमरावती येथील गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभेला भेट दिली आणि पंजाबच्या पूरग्रस्त मदत निधीसाठी कुटुंबाच्या वतीने 5 लाख रुपयांची मदत दिली. प्रकाश पुंड या प्रसंगी विशेष उपस्थित होते. गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभेचे अध्यक्ष अमरजोत सिंग जग्गी म्हणाले की, पोटे कुटुंब नेहमी सामाजिक बांधिलकी जपतात ते नेहमी संकेत काळात मदत करतात अशा सामाजिक उपक्रमामुळे समाजात मानवता आणि सहकार्याची भावना अधिक बळकट होते. गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभेच्या अमरावती येथील व्यवस्थापन समितीच्या वतीने सचिव डॉ. निक्कू खालसा यांनी प्रवीण पोटे-पाटील आणि पोटे पाटील कुटुंबाचे आभार मानले आणि सांगितले की पोटेजींचे समाजाप्रती असलेले समर्पण नेहमीच अतुलनीय राहिले आहे. हे दान पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल आणि शेकडो कुटुंबांचे जीवन बदलेल. पंजाबमधील दुःखद पुरामुळे हजारो कुटुंबे संकटात सापडली आहेत. अशा कठीण काळात, प्रवीण पोटे-पाटील कुटुंबाचे हे योगदान सरबत दा भला (सर्वांचे कल्याण) या शीख परंपरेचे जिवंत उदाहरण असल्याचे सांगण्यात आले. यावेळी गुरुद्वारा गुरुसिंग सभेचे अध्यक्ष अमरज्योतसिंग जग्गी, सचिव डॉ. निक्कू खालसा, खजिनदार रतन दीप सिंग (सोनू) बग्गा, रविंदर सिंग (बिट्टू) सलुजा, राजेंद्रसिंग सलुजा, दिलीप सिंग बग्गा, प्रदीप जी चड्डा, सतपाल सिंग बग्गा, गुरविंदर सिंग राजेश बेदी, अमरजीत सिंग बेदी, राजेंद्र सिंग बग्गा आदी उपस्थित होते. चबडा, कोमल प्रीत सिंग नंदा, गिरीश सिंग सावल, रोहित खुराना, रबजीत सिंग सेठी, वकील सिंग, भाई गुरमान सिंग, सतपाल सिंग, सुमित सिंग आणि संजय कडू उपस्थित होते. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी