भाजप खा. धनंजय महाडिकांकडून पूरग्रस्तांसाठी ५० लाखांचे मदत साहीत्य रवाना
कोल्हापूर, 30 सप्टेंबर (हिं.स.) : अतिमुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्हयांना महापुराचा विळखा पडला आहे. त्यातून प्रापंचिक साहित्याचे आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा पुरग्रस्तांसाठी, भारतीय जनता पार्टी आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यावतीन
पूरग्रस्तांसाठी ५० लाखांचे मदत साहीत्य रवाना


कोल्हापूर, 30 सप्टेंबर (हिं.स.) : अतिमुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्हयांना महापुराचा विळखा पडला आहे. त्यातून प्रापंचिक साहित्याचे आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा पुरग्रस्तांसाठी, भारतीय जनता पार्टी आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यावतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. आज सोलापूरसह मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे किट घेवून ट्रक रवाना झाला. सुमारे ५० लाख रूपये खर्चुन मानवतेच्या भावनेतून भाजप आणि महाडिक परिवाराने हा उपक्रम हाती घेतला आहे.

सन २००५ मध्ये कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा प्रचंड मोठा तडाखा बसला होता. त्यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी, युवाशक्तीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. लोकसहभागातून झालेले ते काम आजही लक्षात आहे. गेल्या आठवड्यात मराठवाड्यात धुवॉंधार पाऊस झाला. सोलापूर, बार्शी यासह मराठवाड्यातील अनेक जिल्हयांना महापुराचा फटका बसला आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. तर कित्येक घरांमध्ये महापुराचे पाणी शिरले. अशा वेळी भाजप आणि खासदार धनंजय महाडिक यांनी, मराठवाड्यातील पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पुरग्रस्तांना उपयोगी ठरेल असे दैनंदिन वापराच्या वस्तूंचे कीट बनवण्यात आले आहे. त्यामध्ये गहू, तांदूळ, तेल, कडधान्य, चटणी, मीठ, टूथपेस्ट, ब्रश, विविध प्रकारचे मसाले, साबण, ब्लँकेट, औषध - गोळ्या असे साहित्य आहे.

मराठवाड्यातील सुमारे दीड हजार नागरिकांसाठी ही कीट आज कोल्हापुरातून रवाना झाली. आमदार अमल महाडिक, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्यासह महाडिक परिवार, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, प्रदीप उलपे, राजसिंह शेळके, भगवानराव काटे, विजयसिंह खाडे, भैय्या शेटके, संग्राम निकम, संजय निकम, विलास वास्कर, मारुती माने, चंद्रकांत घाटगे, महेश वासुदेव, रूपाराणी निकम, उमा इंगळे, भाग्यश्री शेटके यावेळी उपस्थित होते. दोन ट्रक मधून, मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांना हे साहित्य पाठवण्यात आले. पुढील टप्प्यात चादर, ब्लँकेट, जाजम, कपडे यासह जनावरांसाठी चारा पाठवण्याचे नियोजन असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. तसेच राज्य शासन पातळीवरून पुरग्रस्तांना मदत दिली जाईल, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजू मोरे, भरत काळे, सदानंद राजवर्धन, हंबीरराव पाटील, नामदेव पाटील, प्रकाश पाटील, संदीप कुंभार, विशाल शिराळकर, सुधीर राणे, रहीम सनदी, शैलेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande