पाथ इंडिया ग्रुपवर ईडीची छापेमारी
इंदोर, 30 सप्टेंबर (हिं.स.) : देशातील अनेक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आणि पुलांच्या बांधकामाचे कंत्राट घेणाऱ्या पाथ इंडिया ग्रुपवर आज, मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये हवाला व्यवहार
ईडी लोगो


इंदोर, 30 सप्टेंबर (हिं.स.) : देशातील अनेक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आणि पुलांच्या बांधकामाचे कंत्राट घेणाऱ्या पाथ इंडिया ग्रुपवर आज, मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला.

एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये हवाला व्यवहार आणि मनी लॉन्डरिंगचे स्रोत शोधले जात आहेत. या तपासासाठी ईडीच्या टीमने काही महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप्स आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.

या ग्रुपचे मुख्यालय मध्यप्रदेशच्या महू येथे आहे. अनेक गाड्यांमधून आलेल्या ईडीच्या टीमने मंगळवारी सकाळी पाथ ग्रुपच्या मुख्यालयासह संचालकांच्या घरांवर एकाच वेळी छापे टाकले आणि कागदपत्रे जप्त केली. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) नितीन अग्रवाल आहेत. त्यांच्यासोबत नीती अग्रवाल, सक्षम अग्रवाल, निपुण अग्रवाल आणि संतोष अग्रवाल हेही संचालक म्हणून कार्यरत आहेत.

या छापेमारीचा संबंध अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कर्ज घोटाळ्याच्या चौकशीशी जोडला जात आहे. अधिकाऱ्यांना शंका आहे की अनिल अंबानी यांच्या एका कंपनीचे पाथ ग्रुपसोबत काही बांधकाम प्रकल्पांबाबत करार झाले होते.

पाथ इंडियाने इंदोरमधील एमआर-10 ब्रिज, मल्टीलेव्हल पार्किंग, इंदौर-खलघाट मार्ग, इंदौर-मंडलेश्वर मार्ग यांसारख्या अनेक प्रकल्पांवर काम केले आहे. यापूर्वी सुमारे 10 वर्षांपूर्वी आयकर विभागाने देखील या ग्रुपवर छापा टाकला होता, तेव्हाही करचुकवेगिरीचा (टॅक्स चोरीचा) प्रकार उघडकीस आला होता. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाथ ग्रुपवर मंगळवारी दुपारपर्यंत कारवाई सुरू होती.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande