प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिला पक्षात फेरप्रवेश अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.)। अमरावती महानगरपालिका स्थायी समिती माजी सभापती तथा माजी सभागृह नेते तुषार भारतीय यांचे भाजप मधील निलंबन मागे घेतले . मुंबई येथील भाजप कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , सरचिटणीस संजय केणेकर , भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये , नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी चळवळीतून आपल्या समाजसेवेचे सुरुवात तुषार भारतीय यांनी केली, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तुषार भारतीय यांचे नेतृत्व फुलत गेलं. भाजपा विरोधी पक्षात असताना व वर्तमानात सुद्धा अनेक आंदोलने, विकास कामे व समाज उपयोगी कार्यक्रम सतत तुषार भारतीय यांच्याद्वारे अमरावती शहरांमध्ये राबविले गेले. तुषार भारतीय सारख्या कार्यकर्त्यामुळे अमरावती मनपा मध्ये भाजप ची बाजू अधिक भक्कम झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तुषार भारतीय यांचे भाजपात स्वागत करताना म्हटले की, आपल्या अनुभवी नेतृत्वाचा भाजपला मोठा उपयोग होणार आहे. आगामी काळात अमरावती जिल्ह्यात भाजपची अधिक ताकद वाढेल, याची खात्री आहे , तुषार भारतीय यांचा पक्षातील निलंबन मागे हा फक्त एक राजकीय निर्णय नाही, तर निष्ठा, संयम आणि जनतेच्या विश्वासाचं यश आहे. आगामी काळात पक्षाच्या ध्येयधोरणानुसार, शिस्त पाळून आणि जनतेच्या अपेक्षांना केंद्रस्थानी ठेवून पूर्ण जोमाने कार्यरत राहाण्या करण्यासाठी शुभेच्छा देतो .. तुषार भारतीय यांचे पक्षातील निलंबन मागे घेतल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय रणनितीत वेगळीच गती येणार आहे व इतर पक्षासाठी हे मोठे आव्हान ठरणार आहे.तसेच,हा बदल आगामी स्थानिक आणि निवडणुकांमध्ये महत्त्वाचा ठरणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. यावेळी माजी महापौर चेतन गावंडे , भाजप नेते प्रशांत शेगोकर , सचिन मोहोड , आकाश वाघमारे , राजेश जगताप प्रामुख्याने उपस्थित होते . *आपल्या आशिर्वाद आणि विश्वासाच्या बळावर, पुन्हा एकदा सेवेसाठी नव्याने सुरुवात* - तुषार भारतीय आज भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल मी मनापासून आभारी आहे. प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भाजप जे माझे घरच आहे. यात पुन्हा सक्रिय झालो. माझ्या अमरावती जिल्ह्यामधील मधील कार्यकर्ते, समर्थक आणि ज्यांनी कायम मला विश्वास दिला त्यांच्या प्रेमामुळेच आज पुन्हा पक्षाच्या माध्यमातून लोकसेवेची संधी मिळत आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी