अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर
अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाने दि. 01 नोव्हेंबर या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. विभागीय आयुक्त हे शिक्षक मतदार नोंदणी करण्
अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर 30 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत पात्र शिक्षकांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन


अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाने दि. 01 नोव्हेंबर या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. विभागीय आयुक्त हे शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत राहतील. तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे त्या त्या जिल्ह्यासाठी काम करतील. भारत निवडणूक आयोगाने शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रम घोषित केला आहे. पुनरिक्षण कार्यक्रमांचे टप्पे व कालावधी खालीलप्रमाणे आहे.

मंगळवार, दि. 30 सप्टेंबर रोजी मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(3) अन्वये मतदार नोंदणी जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. दि. 15 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(4) अन्वये वर्तमान पत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी करण्यात येईल. दि. 25 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(4) अन्वये वर्तमान पत्रातील नोटीसीची व्दितीय पुर्नप्रसिध्दी करण्यात येईल. दि. 6 नोव्हेंबर रोजी प्रकरणपरत्वे नमूना 18 किंवा 19 व्दारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक राहील. दि. 20 नोव्हेंबर रोजी, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई होईल. दि. 25 नोव्हेंबर, रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात करण्यात येईल. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी हा 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर राहील. तसेच दि. 25 डिसेंबर रोजी, दावे व हरकती निकाली काढण्यात येणार व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे आदी कामे केल्या जाईल. दि. 30 डिसेंबर रोजी मतदार यादीची अंतीम प्रसिध्दी केल्या जाईल.

अमरावती विभागातील सर्व तहसिलदार यांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे पात्र शिक्षकांनी विहीत नमुन्यात मतदार नोंदणी करिता संबंधित तहसिल कार्यालयामध्ये नमूना 19 मधील अर्ज दि. 30 सप्टेंबर ते 06 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत सादर करावा, असे शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय आयुक्त अमरावती यांच्या वतीने अपर आयुक्त रविंद्र हजारे यांनी आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande