केसात गजरा माळल्यामुळे अभिनेत्री नव्या नायरला ऑस्ट्रेलियात लाखोंचा दंड
मुंबई, 8 सप्टेंबर (हिं.स.)। मलयाळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायरला ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विमानतळावर एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या नव्या नायरच्या हँडबॅगमध्ये ठेवलेल्या चम
Actress Navya Nair fined lakhs for wearing gajra


मुंबई, 8 सप्टेंबर (हिं.स.)। मलयाळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायरला ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विमानतळावर एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या नव्या नायरच्या हँडबॅगमध्ये ठेवलेल्या चमेलीच्या फुलांच्या गजऱ्यामुळे तिला तब्बल 1980 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 1.१४ लाख) चा दंड भरावा लागणार आहे.तिला हा दंड 28 दिवसांच्या आत भरावा लागणार आहे.

नव्या नायरने सांगितलं की, तिच्या वडिलांनी कोची विमानतळावरून तिच्यासाठी गजरा खरेदी केला होता. त्यांनी तो दोन तुकड्यांमध्ये विभागून दिला. सिंगापूरला जाणाऱ्या विमानात नव्याने एक भाग केसात माळला, पण सिंगापूर विमानतळावर उतरल्यावर तो गजरा सुकला. दुसरा भाग तिने प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ठेवला आणि मेलबर्न विमानतळावर पोहोचताना तो तिच्या हँडबॅगमध्ये होता. नव्याला माहीत नव्हतं की, अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला फुलं नेणं कायद्याच्या विरोधात आहे.

ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने हँडबॅगची तपासणी केली असता चमेलीच्या फुलांचा तुकडा आढळून आल्यामुळे तिला दंड ठोठावण्यात आला. नव्याने आपल्या आलेला अनुभव सांगताना सांगितलं, की मला माहीत आहे की, मी चूक केली, पण ती जाणूनबुजून केलेली नव्हती. माझ्या वडिलांच्या सल्ल्यानुसार मी गजरा आणला होता.

ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सच्या नियमांनुसार, सरकारच्या परवानगीशिवाय वनस्पती, फुले, बिया इत्यादी जैविक पदार्थ देशात आणण्यास मनाई आहे. यामुळे कीटक, रोग आणि जैविक असंतुलन निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे असे पदार्थ स्थानिक अधिकाऱ्यांकडून धोकादायक मानले जातात आणि कठोर दंडाची तरतूद आहे.

हा प्रकार परदेशात प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या साठी एक इशारा ठरतो – भावनिक वस्तूही असल्या नियमांची काळजीपूर्वक तपासणी करून नेणं आवश्यक आहे, नाहीतर साध्या चुकेमुळे मोठा मनस्ताप आणि आर्थिक फटका बसू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande