
जळगाव, 10 जानेवारी, (हिं.स.) जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली. सोबतच चांदी देखील वधारली आहे. दोन्ही धातुंनी ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना मोठा धक्का दिल्याने बाजारात खळबळ उडाली.जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज शनिवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी १३३९ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४२ हजार ९६४ रूपयांपर्यंत वधारले. यापूर्वी काल शुक्रवारी १३३९ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४१ हजार ६२५ रूपयांपर्यंत वधारले होते. मागच्या दोन दिवसात सोने दरात प्रति तोळा २६७८ रुपयापर्यंतची वाढ झाली.सोन्यासोबतच चांदी देखील महागली आहे.
जळगावमध्ये आज शनिवारी ५१५० रूपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ५७ हजार ५०० रूपयांपर्यंत वधारली. यापूर्वी शुक्रवारी ३०९० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ५२ हजार ३५० रूपयांपर्यंत वधारले होते. गेल्या दोन दिवसात चांदी दरात तब्बल ८२४० रुपये प्रति किलो वाढ झाली आहेएचएसबीसी रिसर्चने आगामी काळात सोन्याच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.एचएसबीसीच्या मते, २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस ५,००० डॉलर्सच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस सुमारे ४,४७१ डॉलर्सच्या आसपास आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर