‘ओ रोमियो’चा दमदार टीझर प्रदर्शित
मुंबई, 10 जानेवारी, (हिं.स.)। बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ ते फुल-फ्लेज्ड अ‍ॅक्शन स्टार असा प्रवास करणारा शाहिद कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपट ओ रोमियोचा जबरदस्त टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर च
मुंबई


मुंबई, 10 जानेवारी, (हिं.स.)। बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ ते फुल-फ्लेज्ड अ‍ॅक्शन स्टार असा प्रवास करणारा शाहिद कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपट ओ रोमियोचा जबरदस्त टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. टीझरमध्ये शाहिदचा धोकादायक आणि आक्रमक अवतार पाहायला मिळतो, मात्र सर्वात मोठा धक्का देणारी बाब म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांचा पूर्णपणे बदललेला लूक, ज्याने प्रेक्षकांना चकित केले आहे.

टीझरची सुरुवात शाहिदच्या इंटेन्स लूक आणि तुफानी अ‍ॅक्शनने होते. एकट्यानेच शत्रूंशी दोन हात करत, गोळ्यांचा वर्षाव करताना तो दिसतो. कबीर सिंह आणि फर्जी नंतर शाहिदचा हा रॉ आणि हिंसक अवतार चाहत्यांना विशेष भावत आहे. मात्र खरा धमाका तेव्हा होतो, जेव्हा पडद्यावर फरीदा जलाल यांची एंट्री होते. आजवर सादगी आणि ममतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फरीदा या वेळी अगदी वेगळ्या, बेधडक आणि बोल्ड अंदाजात दिसतात आणि टीझरची सर्वात मोठी आकर्षण ठरतात.

टीझरमध्ये शाहिद कपूर हातात बंदूक घेऊन फुल अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतो. त्याची व्यक्तिरेखा अत्यंत आक्रमक आणि डार्क छटांची आहे. याशिवाय टीझरमध्ये तृप्ती डिमरी, दिशा पाटनी, नाना पाटेकर, अरुणा ईरानी, विक्रांत मेसी आणि अविनाश तिवारी यांचीही झलक पाहायला मिळते. तसेच तमन्ना भाटिया हिच्या उपस्थितीने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

दरम्यान, वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर शाहिद कपूर केवळ ‘ओ रोमियो’पुरताच मर्यादित नाही. तो लवकरच कॉकटेल 2 मध्येही झळकणार आहे. हा २०१२ मधील सुपरहिट कॉकटेलचा सिक्वेल असून, या चित्रपटात शाहिदसोबत कृती सेनन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असतील. दिग्दर्शक होमी अदजानिया आधुनिक नातेसंबंध, मैत्री आणि लव्ह ट्रँगलची कथा नव्या अंदाजात सादर करण्याच्या तयारीत आहेत. ‘कॉकटेल 2’ हा चित्रपट याच वर्षी सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande