
ठाणे, 11 जानेवारी, (हिं.स.) – ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रभाग क्रमांक 23 मधील चार मतदान केंद्रांचे ठिकाण बदलण्याचा आदेश निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी जारी केला आहे. हा निर्णय मा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेतला असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
प्रभाग क्र. 23 मधील मतदान केंद्र क्र. 23,24,25 व 26 ही चार मतदान केंद्रे प्रत्यक्ष मतदार रहात असलेल्या ठिकाणांपासून दूर असल्याने ती बदलून मिळणेकरिता प्रभाग क्र. 23 मधील चार उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी व कार्यकारी अभियंता यांनी कळवा प्रभाग समिती यांनी एकत्रित संपूर्ण परिसराची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. या पाहणीनुसार मतदारांचे रहिवास ठिकाण व मतदार यादीत जोडलेला भाग याचा साकल्याने विचार करुन प्रभाग क्र. 23 मधील मूळ मतदान केंद्राची ठिकाणे बदलण्याचा निर्णय मा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात आला आहे.
मतदान केंद्र निश्चित केल्यानंतर व त्याची यादी प्रसिध्द झाल्यानंतर जर काही कारणास्तव अपवादात्मक परिस्थितीत मतदान केंद्राचे स्थान किंवा इमारतीत बदल करावयाचा असल्यास संबंधित उमेदवारांशी विचारविनिमय करुन महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत महानगरपालिका आयुक्त यांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य राहील व तसा बदल केल्यानंतर मा. राज्य निवडणूक आयोगास अवगत करणे आवश्यक आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. या निर्देशानुसार प्रभाग क्र. 23 च्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सादर केलेला अहवाल संयुक्तिक असल्याने प्रभाग क्र. 23 मधील 23,24,25 व 26 या चार मतदान केंद्राची ठिकाणे बदलण्यास परवानगी दिली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
*बदल करण्यात आलेली मतदान केंद्र व सुधारित मतदान केंद्र*
*मतदान केंद्र क्र. 23/23*, तेथे असलेल्या मतदारांचा पत्ता : भाग्योदय सोसायटी, साईबाबा मंदिर ते शास्त्रीनगर रोड मनिषानगर, कळवा यादीतील मतदान केंद्राचा पत्ता : ज्ञानप्रसारिणी शिक्षण मंडळ, कळवा, तळमजला रुम नं. 1 पिनकोड 400605 सुधारित मतदान केंद्राचा पत्ता : सायबा क्रीडानगरी मैदानातील मंडप, सायबा हॉलच्या बाजूला, मनिषानगर, कळवा
*मतदान केंद्र क्र. 23/24*, तेथे असलेल्या मतदारांचा पत्ता : गुरुप्रसाद को.ऑ.हौ. सोसायटी, संतोष भुवन, आदर्श प्रियदर्शनी को.ऑ.हौ, गणेश कृपा, अंबर सोसा., कळवा मनिषा नगर मुंबई पुणे रस्त्याच्या मागे कळवा यादीतील मतदान केंद्राचा पत्ता : ज्ञानप्रसारिणी शिक्षण मंडळ, कळवा, तळमजला रुम नं. 2 पिनकोड 400605 सुधारित मतदान केंद्राचा पत्ता : ठा.म.पा चे कळवा आरोग्य केंद्राच्या समोरील मोकळी जागा, मनिषानगर, कळवा
*मतदान केंद्र क्र. 23/25*, तेथे असलेल्या मतदारांचा पत्ता : ज्ञानप्रसारिणी शिक्षण मंडळ, कळवा बालवाडी हॉल, तळमजला पार्टीशन क्र. 1,पिनकोड 400605 यादीतील मतदान केंद्राचा पत्ता : हर्षदीप अर्पा, साई पारिजात सोसा, तरणतलावाच्या मागे श्री पुजा अर्पा ए विंग सायबा पुतळा ते तरण तलावाच्या मागे सुधारित मतदान केंद्राचा पत्ता : हॅलो किडस्, मनिषानगर रुम नं. 1 केंद्र क्र. 25 (खोली)
*मतदान केंद्र क्र. 23/26*, तेथे असलेल्या मतदारांचा पत्ता : ज्ञानप्रसारिणी शिक्षण मंडळ, कळवा बालवाडी हॉल, तळमजला पार्टीशन क्र. 2, पिनकोड 400605 यादीतील मतदान केंद्राचा पत्ता : तरण तलाव ते सायबा पुतळा सुधारित मतदान केंद्राचा पत्ता : हॅलो किडस्, मनिषानगर रुम नं. 2 केंद्र क्र. 26 (खोली)
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर