
त्र्यंबकेश्वर , 11 जानेवारी (हिं.स.)।
संत निवृत्तीनाथ यात्रा सुव्यवस्था दृष्टीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संत निवृत्तीनाथ मंदिराला भेट दिली तसेच परिसराची पाहणी केली.संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थान ट्रस्ट काय काय उपाययोजना करणार आहे याविषयी माहिती संत निवृत्तीनाथ मंदिराचे अध्यक्ष ॲड सोमनाथ घोटेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांना समावेत तहसीलदार गणेश जाधव डीवायएसपी अधिकारी होते. भाविकांसाठी दर्शन बारीचे नियोजन समजावून घेतले. तत्पूर्वी नगरपालिकेत नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार तसेच नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत यात्रा नियोजनाबाबत बैठक झाली. नगरीतील अतिक्रमणे काढण्याचे सूचना आलीप्रसाद योजनेची कामे पूर्णत्वावर आहे . यावेळी दर्जेदार अशी वायरिंग आणि विद्युत व्यवस्था ठेवा अशी सूचना प्रसाद योजनेच्या कामात बाबत जिल्हाधिकारी यांनी केली.प्रसाद योजना, राबवणारेशाखा अभियंता महेश बागुल उपस्थित होते.नाशिक त्रंबक रस्त्याचे काम सुरू आहे परंतु दिंड्या येण्यास आणि वाहने केल्या जाण्यास कोणतेही अडचण येणार नाही या दृष्टीने एकेरी मार्ग देण्यासठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी पुन्हा सांगत आले वेळेत कामे करून देण्यात अल्टिमेट देण्यात आला आहे. अन्य खात्याचे अधिकारी देखील उपस्थित होते. संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात भारतीय वर्गाची अडचण होणार नाही या दृष्टीने लक्ष ठेवा सूचना जिल्हाधिकारी यांनी. ट्रस्ट आणि नगरपालिकेला केलेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV