
कोल्हापूर, 11 जानेवारी (हिं.स.)।
पोलीस अधीक्षक, योगेश कुमार गुप्ता कोल्हापूर यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द, मालाविरुध्द गुन्हे करणारे व बेकायदेशीर अग्निशस्त्रे व जिवघेणे हत्यार जवळ बाळगणे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेऊन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देणेबाबत आदेश दिल्याने सुजितकुमार श्रीरसागर उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल अर्जुन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक व पोलीस स्टाफ यांनी शिरोली ता. हातकणंगले येथील माळवाडी भागात रहाणाऱ्या विनायक कोळी आणि त्याचे इतर 4 साथीदार अशा 5 जणांच्या कार्यरत टोळीवर हदपारीची कारवाई केली.
शिरोली MIDC पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील १) विनायक सुकूमार लाड उर्फ कोळी व.व.२८ रा विलास नगर शिरोली पुलाची ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर (टोळी प्रमुख) व त्याचे साथीदार २) अनिकेत सुकुमार लाड उर्फ कोळी व.व. २४ रा विलास नगर शिरोली पुलाची ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, ३) आशिष लक्ष्मण वाडकर व.व.२८ रा. नागांव ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, ४) श्रीकांत महादेव कोळी व.व. २७ रा.माळवाडी, शिरोली पुलाची ता. हातकंणगले जि. कोल्हापूर, ५) राहूल ऊर्फ आकाश ईश्वर आयवळे व.व.२९ रा शिरोली पुलाची ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे कारवाई करुन कोल्हापूर व सांगली जिल्हयातून एक वर्ष हददपार करण्यात आलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar