‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच, पाकिस्तानने आगळीक करू नये - सैन्यप्रमुख
नवी दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.) : पाकिस्तानात अजूनही 7 ते 8 दहशतवादी तळं सक्रिय आहेत. यासंदर्भात भारताला पूर्ण माहिती असून आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू असून पाकिस्तानने आगळीक केल्यास सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल असा इश
जनरल उपेंद्र द्विवेदी, सैन्य प्रमुख


नवी दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.) : पाकिस्तानात अजूनही 7 ते 8 दहशतवादी तळं सक्रिय आहेत. यासंदर्भात भारताला पूर्ण माहिती असून आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू असून पाकिस्तानने आगळीक केल्यास सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिला. ते आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

याप्रसंगी जनरल द्विवेदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी रचनेला पूर्णपणे नष्ट केले आणि पाकिस्तानच्या परमाणु धमकीचा प्रभाव कमी केला. त्यांनी सांगितले की ऑपरेशन तीनही सेनांच्या सैन्य, वायूसेना आणि नौदल यांच्या उत्कृष्ट समन्वयाचे उदाहरण आहे. ऑपरेशन सिंदूर अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि अचूकतेने पार पडले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ऑपरेशनमध्ये एकूण 88 तास लागले, ज्यात पहिल्या 22 मिनिटांतच मुख्य हल्ले सुरू झाले. या ऑपरेशनमध्ये एकूण 9 टार्गेट्सपैकी 7 पूर्णपणे नष्ट करण्यात आले. त्यांनी विशेष सांगितले की भारताने फक्त दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले; सामान्य नागरिक किंवा सैन्य ठिकाणांना हानी पोहोचवली गेली नाही.

जनरल द्विवेदींनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा देत म्हटले की, तुमच्याकडे अजूनही 8 दहशतवादी तळं सक्रिय असून त्याची यादी आणि माहिती आमच्याकडे आहे. भविष्यात पाकिस्तानातून कोणतीही चुकीची हालचाल केल्यास कठोर उत्तर दिले जाईल ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही असा सुस्पष्ट इशारा सैन्यप्रमुखांनी दिला.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande