नांदेड - हिमायतनगरच्या नगरपंचायत उपाध्यक्षपदी विनोद गुंडेवार
नांदेड, 17 जानेवारी, (हिं.स.)। हिमायतनगर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे विनोद गुंडेवार यांची निवड झाली. यावेळी पीठासन अधिकारी नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब, मुख्याधिकारी सूर्यकांत ताडेवाड यांच्यासह १७ नगरसेवक उपस्थित होते. उपनगरा
नांदेड - हिमायतनगरच्या नगरपंचायत उपाध्यक्षपदी विनोद गुंडेवार


नांदेड, 17 जानेवारी, (हिं.स.)। हिमायतनगर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे विनोद गुंडेवार यांची निवड झाली. यावेळी पीठासन अधिकारी नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब, मुख्याधिकारी सूर्यकांत ताडेवाड यांच्यासह १७ नगरसेवक उपस्थित होते.

उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाकडून विनोद गुंडेवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता तर शिंदे सेना व भाजपच्यावतीने सुभाष बलपेलवाड यांनी अर्ज दाखल केला होता. काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला उद्धव सेनेने पाठिंबा दिला. काँग्रेसच्या नगराध्यक्षासह आठ नगरसेवक व उद्धव सेनेचे तीन आणि शरद पवार गट एक असे १३ नगरसेवकांनी मतदान केल्याने काँग्रेसचे विनोद गुंडेवार उपनगराध्यक्षपदी निवड झाली. शिंदेसेनेचे सुभाष बलपेलवाड यांना शिंदे सेनेचे दोन तर भाजपचे तीन असे पाच मते पडली. भाजपचे डॉ. राजेंद्र वानखेडे यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली.

दरम्यान, या निवडीनंतर माजी आ. माधवराव जवळगावकर व नगराध्यक्ष शेख रफीफ यांनी उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांचा सत्कार केला. याप्रसंगी सुभाष राठोड, गजानन सूर्यवंशी, जनार्धन ताडेवाड, डॉ. प्रकाश वानखेडे, अ. अखील, समदखान, मुजतबा मतीन, कंजुल फिरदोस, हसीना बेगम अब्दुल सलाम, कमल मेंढके, दर्शना पंडित, शेख सलमाबी इलियास, सलमा खानम, समद खान, विठ्ठल ठाकरे, जिशान मिर्झा, सुचिता राठोड, सरदार खान, दर्शना चायल, आशिष सकवान, भारत डाके, सुभाष बलपेलवाड, अरुणा भगवान मुद्देवाड उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande