माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद उमेदवाराचे भवितव्य ‘इंजिन’वर अवलंबून ?
रायगड, 21 जानेवारी, (हिं.स.)। माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद वार्डातील निवडणूक यंदा विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. या वार्डातील उमेदवाराचे भवितव्य कोणत्या ‘इंजिन’ला मतदारांचा कौल मिळतो, यावर अवलंबून असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर
माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद उमेदवाराचे भवितव्य ‘इंजिन’वर अवलंबून


माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद उमेदवाराचे भवितव्य ‘इंजिन’वर अवलंबून


रायगड, 21 जानेवारी, (हिं.स.)। माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद वार्डातील निवडणूक यंदा विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. या वार्डातील उमेदवाराचे भवितव्य कोणत्या ‘इंजिन’ला मतदारांचा कौल मिळतो, यावर अवलंबून असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांना लोकप्रिय असलेले जितू पाटील हे केंद्रस्थानी आले आहेत. सामाजिक, शैक्षणिक व विकासकामांमुळे त्यांनी पक्षभेद न करता नेतृत्व उभे केले असून, ते या जिल्हा परिषद वार्डात वास्तव्यास आहेत.

जितू पाटील यांनी यापूर्वी अनेकदा पक्षविरहित पद्धतीने काम करत सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच्या पत्नीला पंचायत समिती प्रमुख पदासाठी दावेदार म्हणून पुढे केले असून, जिल्हा परिषदेसाठीही उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, मनसेची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने या जिल्हा परिषद मतदारसंघात हालचाली वेग घेत आहेत. पंचायत समिती निवडणुकीसाठी मनसेकडून प्रियांका जितेंद्र पाटील यांनी अधिकृत उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या भागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून, मतदारांचे लक्ष ‘इंजिन’ विरुद्ध स्थानिक नेतृत्व या मुद्द्यांवर केंद्रित झाले आहे. विकास, पारदर्शकता आणि स्थानिक प्रश्न सोडवण्याची क्षमता यावरच अंतिम निकाल ठरणार असल्याचे चित्र सध्या माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद वार्डात पाहायला मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande