दिग्दर्शिका जोत्स्ना पेठे यांच्या ‘पिरमाचा नाद खुळा' गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
मुंबई, 21 जानेवारी, (हिं.स.)। पूर्वश्रमीच्या ठाण्यातील पत्रकार, छायाचित्रकार जोत्स्ना सुचिता जयंत पेठे यांनी दिग्दर्शित केलेले `पिरमाचा नाद खुळा'' हे गाणं सध्या छोट्या पडद्यावर, सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या गाण्याची संकल्पना
Nad khula


मुंबई, 21 जानेवारी, (हिं.स.)। पूर्वश्रमीच्या ठाण्यातील पत्रकार, छायाचित्रकार जोत्स्ना सुचिता जयंत पेठे यांनी दिग्दर्शित केलेले `पिरमाचा नाद खुळा' हे गाणं सध्या छोट्या पडद्यावर, सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या गाण्याची संकल्पना, पटकथा आणि निर्मिती अशी चौफेर जबाबदारी जोत्स्ना पेठे यांनी पेलत एक दर्जेदार कलाकृतीची निर्मिती केली असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

कोणताही मोठा वारसा पाठिशी नसताना केवळ जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर ठाण्याच्या रहिवासी असलेल्या जोत्स्ना पेठे यांनी मॅजेस्टीक फिल्म्स प्रॉडक्शनच्या बॅनर खाली ‘पिरमाचा नाद खुळा' या गाण्याच्या माध्यमातून मराठी संगीत क्षेत्रात आपली मोहोर उमटवली आहे.

गाण्याचे चित्रीकरण करतांनाही जोत्स्ना पेठे यांनी आपल्या आजोळची म्हणजेच शहापूर तालुक्यातील अघई या आपल्या दुर्लक्षित आदिवासी गावाची निवड केली आहे. तानसा तलाव परिसराची निसर्ग सुंदरता या गाण्यात प्रेक्षकांना पाहता येत आहे. गावची शांतता, माणसांची साधी जीवनशैली आणि निसर्ग यामुळे गाण्याला कृत्रिम सेटस् पेक्षा खरी माती आणि खरी भावना मिळाली आहे.

जोत्स्ना पेठे यांनी कलाकारांची निवड करतांना सुध्दा ठाणे हाच केंद्रबिंदू ठेवला आहे. गाण्यातील नायक आयुष संजीव हा सुध्दा ठाणेकर आहे. आयुषचा साधेपणा आणि सहज अभिनयशैली या गाण्यात अगदीच चपखल ठरली असून प्रेक्षक त्याच्या अभिनयाला दाद देत आहेत. तर नायिका म्हणून अनुश्री माने हिने काम केले आहे. दोन्ही कलाकारांनी सध्या सुरु असलेल्या बिग बॉस - ६ मराठी मध्ये स्पर्धक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

इंडियना आयडॉल फेम सायली कांबळे हिने ‘पिरमाचा नाद खुळा' हे गाणे आपल्या सुमधूर आवाजात गायले आहे. सायलीच्या आवाजातील गोडव्याने या गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. सोबतीला मराठी फिल्म संगीतामध्ये सध्याचे आघाडीचे गायक हर्षवर्धन वावरे यांचा दमदार आवाज या गाण्याला लाभला आहे. संगीत राजेंद्र साळुंके यांचे आहे.

कोणत्याही मार्केटिंगचा फंडा न वापरता हे गाणे आज प्रेक्षकांच्या मुखात बसले आहे. सोशल मीडिया फेसबुक आणि इन्स्टाग्राम, युट्युब, झी म्यूझिक मराठी चॅनल, झी म्यूझिक मराठी युट्युब वर हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande