शाहिद कपूरच्या ‘ओ रोमियो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मुंबई, 21 जानेवारी, (हिं.स.)। बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर चा आगामी चित्रपट ‘ओ रोमियो’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये शाहिदचा जबरदस्त अ‍ॅक्शनने भरलेला आणि रोमँटिक असा नवा अवतार पाहायला मिळतो. ‘ओ रोमियो’च्या ट्रेलरमध्ये शाहिद एका
विक्रांत मैसी, तमन्ना भाटिया, नाना पाटेकर, अविनाश तिवारी और फरीदा जलाल


मुंबई, 21 जानेवारी, (हिं.स.)। बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर चा आगामी चित्रपट ‘ओ रोमियो’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये शाहिदचा जबरदस्त अ‍ॅक्शनने भरलेला आणि रोमँटिक असा नवा अवतार पाहायला मिळतो.

‘ओ रोमियो’च्या ट्रेलरमध्ये शाहिद एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसतो. तो स्वतःला ‘हिरो’ म्हणवून घेतो. मात्र त्याचा हा हिरो निर्दयी, क्रूर आणि भयावह असल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट होते. लोकांना ठार मारल्यानंतर आनंद साजरा करत नाचताना दाखवलेला शाहिदचा अंदाज त्याच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.

ट्रेलरमध्ये ठळक रोमँटिक अँगलही पाहायला मिळतो. शाहिदसोबत अभिनेत्री तृप्ति डिमरी झळकत असून दोघांमधील केमिस्ट्री लक्षवेधी ठरते. अ‍ॅक्शन, हिंसा आणि प्रेम यांचा संगम ट्रेलरला अधिक प्रभावी बनवतो.

या चित्रपटात शाहिद कपूरसह विक्रांत मेस्सी, तमन्ना भाटिया, नाना पाटेकर, अविनाश तिवारी आणि फरीदा जलाल महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

‘ओ रोमियो’बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून हा चित्रपट येत्या १३ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande