पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
पुणे, 03 जानेवारी (हिं.स.)। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. निवडणूक प्रचारावेळी आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या मुलाने पैस
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल


पुणे, 03 जानेवारी (हिं.स.)। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. निवडणूक प्रचारावेळी आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या मुलाने पैसे वाटल्याचा आरोप आहे. प्रभाग ९ मध्ये पैसे वाटल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

पुण्यातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये मध्यरात्री मोठा ड्रामा झाला. मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे वाटण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. बाबुराव चांदेरे यांनी प्रभागात पैसे वाटल्याचा आरोप अनेक राजकीय पक्षांकडून करण्यात आला होता.किरण चांदेरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चांदेरे यांच्या मुलासह १४ जण मतदारसंघात मतदारांच्या याद्या घेऊन फिरत होते. तसंच त्यांनी मतदारांना प्रभावित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. बाबुराव चांदेरे हे पुण्यात प्रभाग क्रमांक ९ मधून लढत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande