सोलापूर - चंदेले महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
सोलापूर, 03 जानेवारी (हिं.स.) स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाई छन्नुसिंग चंदेले समाजकार्य महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजातील महिलांना शिक्षणाच्या माध्यमातू
सोलापूर - चंदेले महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन


सोलापूर, 03 जानेवारी (हिं.स.) स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाई छन्नुसिंग चंदेले समाजकार्य महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजातील महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे ऐतिहासिक कार्य सावित्रीबाईंनी केले असून त्यांचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यसेनानी भाई छन्नुसिंग चंदेले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे सदस्य अमृतदत्त चिन्नी व राहुलसिंग चंदेले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रभारी प्राचार्य एस. बी. गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेत शिक्षणातून समाज परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. बी. एन. भास्कर व प्रा. व्ही. के. मोरे यांनीही आपल्या मनोगतात सावित्रीबाईंच्या संघर्षमय जीवनाचा व स्त्री शिक्षणासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला.

कार्यक्रमास प्रताप चंदेले, महादेव गावडे, राणी भुजंगे, संजय कांबळे, सचिन कांबळे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande