पश्चिम बंगाल : संदेशखाली येथे पोलिसांवर हल्ला, 6 जवान जखमी
कोलकाता, 03 जानेवारी (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील संदेशखाली भागात शनिवारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात सहा पोलिस
संदेश खालीत पोलिस बंदोबस्त


कोलकाता, 03 जानेवारी (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील संदेशखाली भागात शनिवारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात सहा पोलिस कर्मचारी जखमी झाले असून पोलिस वाहनांचेही नुकसान झाले आहे.

जमिनीच्या ताब्यावरून टीएमसीच्या दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक करत हल्ला केला. जखमी पोलिसांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 11 जणांना अटक केली असून, अटक करण्यात आलेले सर्वजण टीएमसीचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे. हे सर्व आरोपी संदेशखाली प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेला टीएमसी नेता शहाजहान शेख यांचे निकटवर्तीय असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू असून परिस्थितीवर प्रशासनाची बारकाईने नजर आहे.

उल्लेखनीय म्हणजे, याच संदेशखाली भागात 2 वर्षांपूर्वी रेशन वितरण घोटाळ्याच्या चौकशीत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकावरही हल्ला झाला होता, ज्यामध्ये ईडीचे अनेक अधिकारी जखमी झाले होते. त्यामुळे या भागातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande