पैठण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विद्या कावसाणकर कार्यभार पुढील आठवड्यात स्वीकारणार
छत्रपती संभाजीनगर, 03 जानेवारी (हिं.स.)।पैठण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विद्या कावसाणकर आपल्या पदाचा कारभार पुढील आठवड्यात स्वीकारणार आहेत. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदाचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. पैठण नगर परिषदेमधील तीन स्वीकृत नगरसेवकांसाठी पन्न
पैठण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विद्या कावसाणकर कार्यभार पुढील आठवड्यात स्वीकारणार


छत्रपती संभाजीनगर, 03 जानेवारी (हिं.स.)।पैठण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विद्या कावसाणकर आपल्या पदाचा कारभार पुढील आठवड्यात स्वीकारणार आहेत. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदाचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. पैठण नगर परिषदेमधील तीन स्वीकृत नगरसेवकांसाठी पन्नास हून अधिक दावेदार असल्याचे सांगण्यात आले असून खासदार संदिपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्याकडे लॉबिंग सुरू केली आहे.

पैठण नगर परिषदेत तीन स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. या तीन स्वीकृत नगरसेवकांसाठी आमदार विलास भुमरे यांच्याकडे पन्नासहून अधिक इच्छुकांनी दावेदारी केली आहे. तीन स्वीकृत नगरसेवकांत आमदार विलास भुमरे कोणाच्या नावाला पसंती देणार हे बघावे लागेल.

आमदार विलास भुमरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने १९ जागांवर एकहाती सत्ता मिळवली आहे. आता तीन स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी शिवसेना आमदारांच्या जवळच्या कार्यकत्त्यर्त्यांना संधी मिळणार आहे. आमदार विलास भुमरे यांनी नगर परिषदमध्ये 'मी पैठणकर' म्हणून काम करण्यावर भर दिला आहे. शहराच्या विकासासाठी काम करणाऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल, असे आमदार भुमरे यांनी स्पष्ट केले आहे. भुमरे कोणाच्या नावाला पसंती देणार हे पुढील आठवड्यात स्पष्ट होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande