पुणे : एकूण १ हजार १६५ उमेदवारांमध्ये राजकीय लढाई सुरू
पुणे, 03 जानेवारी (हिं.स.)। पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी शहरात इच्छुकांचे पेव फुटले होते. ९६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेत तलवारी म्यान केल्या आहेत. निवडणुकीचे रण तापले असून, आता प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवार अशा १६५ जागांवर एकूण १ हजार १६५ उ
पुणे : एकूण १ हजार १६५ उमेदवारांमध्ये राजकीय लढाई सुरू


पुणे, 03 जानेवारी (हिं.स.)। पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी शहरात इच्छुकांचे पेव फुटले होते. ९६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेत तलवारी म्यान केल्या आहेत. निवडणुकीचे रण तापले असून, आता प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवार अशा १६५ जागांवर एकूण १ हजार १६५ उमेदवारांमध्ये राजकीय लढाई सुरू झाली आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक पावणेनऊ वर्षांनंतर होत आहे, तर गेल्या पावणेचार वर्षांपासून सुरू असलेले ‘प्रशासकराज’ जानेवारी महिन्यात संपणार आहे. पुणे महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली होती. गेल्या महिन्याभरात शहरात अनेक राजकीय घडामोडी घडल्याने नवीन राजकीय समीकरणे या निवडणुकीत जन्माला आली आहेत. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार मिळवण्यासाठीही राजकीय पक्षांना धावपळ करावी लागली होती.

त्यात अनेकांनी बंडखोरी केल्याने प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली करत बहुतांश बंडखोरांचे बंड मोडण्यात यश मिळविले. अनेकांनी माघार घेत ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचे जाहीर केले. अर्ज माघारीनंतरही दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे शहरातील ४१ प्रभागांमध्ये १६३ जागांवर चुरशीची निवडणूक पाहायला मिळणार आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज येथे स्मिता कोंढरे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande