पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये एस. एस. ग्रुपचे विश्वास शिंदे यांचा भाजपात प्रवेश
सोलापूर, 03 जानेवारी (हिं.स.)एस. एस. ग्रुपचे प्रमुख विश्वास शिंदे यांनी शेकडो सहकाऱ्यांसह पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी त
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये एस. एस. ग्रुपचे विश्वास शिंदे यांचा भाजपात प्रवेश


सोलापूर, 03 जानेवारी (हिं.स.)एस. एस. ग्रुपचे प्रमुख विश्वास शिंदे यांनी शेकडो सहकाऱ्यांसह पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, सुहास शिंदे, भाजपा प्रभाग क्रमांक ५ चे उमेदवार समाधान आवळे, बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी, अलका भवर, तसेच आनंद भंवर, सुरेश तोडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भारतीय जनता पार्टी हा विकासाला प्राधान्य देणारा पक्ष आहे. आगामी काळात भारतीय जनता पार्टी सोलापूर महानगरपालिकेवर आपला विजयी झेंडा रोवणार आहे, याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास आहे. भाजपाची सत्ता मनपावर पुन्हा एकदा आल्यानंतर सोलापूर शहराचा चौफेर विकास करण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. अशा काळात सोलापुरातील अनेक महत्त्वाचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. हा सोलापूर शहरातील राजकारण आणि समाजकारणात क्षेत्रातील मान्यवरांचा भाजपवर असलेला विश्वास आहे, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे याप्रसंगी म्हणाले.

महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विश्वास शिंदे आणि सुहास शिंदे यांनी याप्रसंगी दिली. यावेळी सुहास शिंदे यांनी एस. एस. ग्रुपचा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा जाहीर केला.यावेळी स्नेहल शिंदे, ऋषिकेश शिंदे, देविदास वाघमारे, आकाश शिंदे, दीपक जगताप, ऍड. शैलेश पोटफोडे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande