छ. संभाजीनगर - ठाकरे पक्षाच्या दानवे यांच्याकडून जाहीर सभेतून प्रचार सुरू
छत्रपती संभाजीनगर, 03 जानेवारी (हिं.स.)। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी प्रचार सुरू केला आहे. स्थानिक प्रश्नावर त्यांनी अधिक भर दिला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवसेना –
अ


छत्रपती संभाजीनगर, 03 जानेवारी (हिं.स.)। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी प्रचार सुरू केला आहे. स्थानिक प्रश्नावर त्यांनी अधिक भर दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक 24 चे अधिकृत उमेदवार

श्री.दिनकर भीमराव खरात

सौ.अनुराधा गणेश खवले

सौ.दीपाली महेश जगताप

श्री.भाऊसाहेब तुकाराम राते

यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेस संबोधित केले.

या सभेत प्रभागातील विकास, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या सर्व अधिकृत उमेदवारांना 15 जानेवारी रोजी प्रचंड संख्येने मतदान करून विजयी करा, असे आवाहन केले.

याप्रसंगी शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे,माजी नगरसेवक कमलाकर जगताप,युवासेना जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे व महिला आघाडी सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande