मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येनंतर भाजप कार्यकर्ते नाचले; उमेदवारासह १५ जणांवर गुन्हा
सोलापूर, 03 जानेवारी (हिं.स.)। सोलापुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यावरून झालेल्या वादानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात भाजपच्या १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बाळा
मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येनंतर भाजप कार्यकर्ते नाचले; उमेदवारासह १५ जणांवर गुन्हा


सोलापूर, 03 जानेवारी (हिं.स.)।

सोलापुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यावरून झालेल्या वादानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात भाजपच्या १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींकडून निवडणुकीतून माघार घेण्यासाठी धमकी देण्यात आली. त्यानंतर बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि तलवारीने वार केले गेले. या हल्ल्यात बाळासाहेब सरवदे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. आरोपींनी हल्ला केल्यानंतर विकेट पडलीय म्हणत आनंद साजरा केल्याचा दावाही तक्रारदार बाजीराव सरवदे यांनी केलाय.

मनपा निवडणुकीत बाळासाहेब सरवदे यांनी अपक्ष फॉर्म भरला होता. त्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी शालन शंकर शिंदे, शंकर बाबू शिंदे, सुनील शंकर शिंदे, विशाल शंकर शिंदे यांनी धमकी दिली होती. तुम्हाला गल्लीत रहायचं आहे ना? फॉर्म मागे घेतला नाही तर बघून घेतो अशा शब्दात धमकी दिली होती असं बाजीराव सरवदे यांनी तक्रारीत म्हटलंय.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande