
सोलापूर, 05 जानेवारी (हिं.स.)। सोलापुरातील मनसे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी आज तासवडे टोल नाक्यावर पकडले. तळबीड पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या आरोपींना पुढील तपासासाठी सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.राज्यात महानगर पालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरवदे यांची हत्या झाली. निवडणुकीत उमेदवारीच्या वादातून मनसे विद्यार्थीसेनेचा शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदेंची हत्या झाली होती. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली होती. या खून प्रकरणातील शंकर शिंदे, सुनील शिंदे, आलोक शिंदे आणि महेश भोसले,हे चार संशयित फरार झाले होते. दरम्यान, आज (सोमवार) सकाळी तळबीड पोलिसांनी कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड