सोलापूर-मनविसे शहर प्रमुखांच्या खूनप्रकरणी 11 आरोपींना चार दिवसांची कोठडी
सोलापूर, 05 जानेवारी (हिं.स.)जोशी गल्ली, रविवार पेठ परिसरात निवडणुकीच्या वादातून मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरवद यांची तलवार व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आणखी अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना चार दि
सोलापूर-मनविसे शहर प्रमुखांच्या खूनप्रकरणी 11 आरोपींना चार दिवसांची कोठडी


सोलापूर, 05 जानेवारी (हिं.स.)जोशी गल्ली, रविवार पेठ परिसरात निवडणुकीच्या वादातून मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरवद यांची तलवार व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आणखी अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यामध्ये विशाल शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, राहुल राजू सरवदे, ईश्वर सिद्धेश्वर शिंदे, रोहित राजू सरवदे, महेश शिवाजी भोसले, शंकर बाबू शिंदे, अनिल शंकर शिंदे, शारदा तानाजी शिंदे, आलोक तानाजी शिंदे, विशाल ऊर्फ दादू संजय दोरकर या अकरा आरोपींना जेलरोड पोलिस ठाण्याचे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

याबाबत माहिती अशी की, मृताचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे (25, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींनी निवडणुकीत उभे राहू नये म्हणून धमकी दिली होती. अपक्ष अर्ज मागे घ्या, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी उघड धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. 2 जानेवारी रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 4.45 च्या दरम्यान हनुमान मंदिराजवळ आरोपींनी वाद घालून बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यांत चटणी टाकून त्यांना काहीही दिसू नये अशी स्थिती निर्माण केली. त्यानंतर काही आरोपींनी त्यांचे हात पकडले, तर काही आरोपींनी तलवार व कोयत्याने छातीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande