बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या ,२४ तासांत दुसरी घटना
ढाका , 06 जानेवारी (हिं.स.)।बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हल्ले थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. अशातच आता बांगलादेशमध्ये किराणा दुकानाचा मालक म्हणून काम करणाऱ्या एका हिंदू व्यक्तीची सोमवारी हत्या करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत अशा प्रकारची ही
बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या


ढाका , 06 जानेवारी (हिं.स.)।बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हल्ले थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. अशातच आता बांगलादेशमध्ये किराणा दुकानाचा मालक म्हणून काम करणाऱ्या एका हिंदू व्यक्तीची सोमवारी हत्या करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, राजधानी ढाक्याच्या बाहेरील नरसिंगदी परिसरात सोमवारी रात्री सुमारे 10 वाजता 40 वर्षीय हिंदू युवक शरत चक्रवर्ती मणी यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, शरत नरसिंगदी येथील चारसिंदूर बाजारात आपल्या किराणा दुकानात उपस्थित होते. त्याच वेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिक त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जात असताना, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृत शरत चक्रवर्ती मणी हे यापूर्वी दक्षिण कोरियामध्ये काम करत होते आणि काही वर्षांपूर्वी ते बांग्लादेशमध्ये परतले होते.ही हत्या हिंदू समाजातील सदस्यांना लक्ष्य करून केल्या जाणाऱ्या हिंसक घटनांच्या मालिकेतील ताजी घटना मानली जात आहे.

यापूर्वी 3 जानेवारी रोजी 50 वर्षीय खोकन चंद्र दास यांच्यावर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला. त्यांना मारहाण करण्यात आली, धारदार शस्त्रांनी जखमी करण्यात आले आणि नंतर जाळण्यात आले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याआधी 24 डिसेंबर रोजी राजबाडी शहरातील पांग्शा उपजिल्ह्यात कथित खंडणीच्या आरोपाखाली आणखी एका हिंदू व्यक्ती अमृत मंडल यांना मारहाण करून ठार करण्यात आले. यापेक्षाही आधी, 18 डिसेंबर रोजी मैमनसिंह शहरात 25 वर्षीय दीपू चंद्र दास यांना कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली जमावाने मारहाण करून ठार केले आणि त्यांच्या मृतदेहाला आग लावण्यात आली.एका अन्य घटनेत, 23 डिसेंबर रोजी चटगावच्या बाहेरील भागातील राउजान परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी कतारमध्ये काम करणारे प्रवासी मजूर शुख शिल आणि अनिल शिल यांच्या घराला आग लावली. मात्र, घरात राहणारे सर्वजण कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी ठरले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande