
मुंबई, 06 जानेवारी (हिं.स.)। भारतातील वेगाने वाढणाऱ्या गुंतवणूक प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या बजाज ब्रोकिंगने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) सोबत एक महत्त्वाची धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीचा उद्देश गुंतवणूक अधिक सोपी, सुरक्षित आणि माहितीपूर्ण बनवणे हा आहे.
या सहकार्यामुळे दोन्ही संस्थांच्या ताकदी एकत्र येऊन गुंतवणूकदारांना अधिक चांगला प्रवेश, आर्थिक जागरूकता, नवीन प्रॉडक्ट इनोव्हेशन, तसेच गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या भागीदारीतील एक महत्त्वाचा फोकस म्हणजे गुंतवणुकीतील अडथळे कमी करणे. सोपी ऑनबोर्डिंग प्रक्रिया, जलद अकाउंट अॅक्टिव्हेशन आणि एकत्रित सिस्टम्समुळे गुंतवणूकदार कुठूनही आणि कधीही सहजपणे आपली गुंतवणूक सुरू करू शकतील.
गुंतवणूकदारांचे शिक्षण आणि संरक्षण हेदेखील या भागीदारीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. स्ट्रक्चर्ड फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम्स, डिजिटल माध्यमांद्वारे पोहोच आणि कॉलेज-कॅम्पस उपक्रमांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना बाजार समजून घेण्यासाठी आवश्यक ज्ञान देण्यात येणार आहे, जेणेकरून ते जबाबदारीने गुंतवणूक करू शकतील. बजाज ब्रोकिंगची #ऑड है तो फ्रॉड है ही मोहीम एनएसडीएल सोबत अधिक मोठ्या स्तरावर राबवली जाणार असून, यामध्ये ऑनलाइन फसवणूक कशी ओळखावी, कोणते रेड फ्लॅग्स लक्षात घ्यावेत आणि सुरक्षित डिजिटल गुंतवणुकीसाठी कोणत्या सवयी ठेवाव्यात याबाबत जागरूकता निर्माण केली जाईल.
या भागीदारीतून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवे प्रयोग केले जाणार आहेत. बजाज ब्रोकिंग आणि एनएसडीएल एकत्र काम करून गुंतवणूकदारांच्या गरजेनुसार नवीन फीचर्स आणि प्रॉडक्ट अनुभव विकसित करतील. अकाउंट ओपनिंग आणि व्यवहार प्रक्रिया अधिक सोपी करणे, रिअल-टाइम माहिती देणे आणि विविध अॅसेट क्लासमध्ये सहज गुंतवणूक करता येईल अशा डिजिटल सोल्युशन्सवर भर दिला जाणार आहे. या तंत्रज्ञानाधारित सुधारणा रिटेल गुंतवणुकीत सोय आणि सुलभतेची नवी व्याख्या करतील.
याबाबत बोलताना बजाज ब्रोकिंगचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ मनीष जैन म्हणाले, “एनएसडीएल सोबतची ही भागीदारी भारतीय गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक अधिक सुरक्षित, सोपी आणि सहज उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. बजाज आणि एनएसडीएल या दोन्ही संस्थांवर वित्तीय क्षेत्रात असलेला विश्वास, सुरक्षित आणि पारदर्शक गुंतवणूक अनुभव देण्यासाठी मजबूत पाया निर्माण करतो. आमच्या संयुक्त ताकदीच्या जोरावर आम्ही गुंतवणूकदारांना केवळ अॅक्सेस आणि माहितीच नाही, तर सुरक्षिततेचा विश्वासही देऊ इच्छितो. डिजिटल शिक्षण, फसवणूक प्रतिबंध आणि सुरक्षित गुंतवणूक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू.”
एनएसडीएलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ विजय चांडोक म्हणाले,“भारताच्या कॅपिटल मार्केटमध्ये विश्वास आणि सुरक्षितता मजबूत करण्यामध्ये एनएसडीएलने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बजाज ब्रोकिंगसोबतचे हे सहकार्य आमच्या समान उद्दिष्टांना पुढे नेणारे आहे. तंत्रज्ञान आणि सहकार्याच्या माध्यमातून गुंतवणूकदार जागरूकता वाढवणे, गुंतवणुकीची सुलभता वाढवणे आणि भारतातील गुंतवणूक परिसंस्थेचा पुढील टप्पा मजबूत करणे हा आमचा प्रयत्न आहे.” ही भागीदारी गुंतवणूकदार सक्षमीकरणाचा नवा अध्याय ठरत असून, तंत्रज्ञान, विश्वास आणि पारदर्शकता यांच्या जोरावर भारतीय गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule