जपानमध्ये रिश्टर स्केलवर 6.2 तीव्रतेचा भूकंप
टोकियो , 06 जानेवारी (हिं.स.)।जपानच्या पश्चिम भागात मंगळवारी शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.2 इतकी नोंदवण्यात आली असून यामध्ये सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या तरी या भूकंपामुळे कोणतीही जीवित
जपानमध्ये रिश्टर स्केलवर 6.2 तीव्रतेचा भूकंप


टोकियो , 06 जानेवारी (हिं.स.)।जपानच्या पश्चिम भागात मंगळवारी शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.2 इतकी नोंदवण्यात आली असून यामध्ये सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या तरी या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

जपान हवामान विज्ञान संस्थेच्या माहितीनुसार, सुरुवातीला 6.2 तीव्रतेचा हा भूकंप उत्तर-पश्चिम जपानमधील शिमाने प्रांतात केंद्रित होता. भूकंपाचे धक्के शिमाने प्रांताची राजधानी मात्सुए तसेच आसपासच्या शहरांमध्ये जाणवले. यामध्ये शेजारच्या तोत्तोरी प्रांतातील काही शहरांचाही समावेश आहे. भूकंपानंतर स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. नागरिकांना सावध राहण्याचे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थेने सांगितले की, भूकंपाचे केंद्र किनाऱ्यापासून सुमारे 10 किलोमीटर (6.2 मैल) खोलीवर होते. तसेच सुनामीचा कोणताही धोका नसल्याची पुनःपुष्टी करण्यात आली आहे. या भूकंपामुळे कोणीही जखमी झाले नसल्याची किंवा कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद झालेली नाही.

जपानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, संभाव्य नुकसानीचा आढावा घेण्यासाठी लष्करी विमानांच्या माध्यमातून हवाई सर्वेक्षण केले जात आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही मोठ्या नुकसानीची पुष्टी झालेली नाही.

याआधी 31 डिसेंबर रोजीही जपानमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या दिवशी झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.0 इतकी मोजली गेली होती. हा भूकंप जपानच्या पूर्वेकडील नोडा परिसराच्या किनाऱ्याजवळ झाला होता आणि त्याचे केंद्र जमिनीखाली सुमारे 19.3 किलोमीटर खोलवर होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande