
आगामी 14 जानेवारीपासून सुरू होणार बुकिंग
ठाणे, 06 जानेवारी (हिं.स.) : देशातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आपली नवीन प्रीमियम एसयूव्ही XUV 7XO भारतीय बाजारात सादर केली आहे. ₹13.66 लाख (एक्स-शोरूम) किमतीपासून सुरू होणारी ही एसयूव्ही, यशस्वी XUV700 च्या पुढील टप्प्याचे प्रतिनिधित्व करते. नोंदणी आणि डिलिव्हरी 14 जानेवारी पासून सुरू होणार आहे.
एसयूव्ही 7XO मध्ये जगात प्रथमच सादर होणारी DAVINCI सस्पेन्शन प्रणाली, भारतातील पहिली ICE Software Defined Vehicle (SDV), तसेच कोस्ट-टू-कोस्ट ट्रिपल स्क्रीन यांसारख्या अत्याधुनिक नवकल्पना देण्यात आल्या आहेत. या मॉडेलद्वारे महिंद्राने प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये तंत्रज्ञान-केंद्रित नेतृत्व अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, XUV 7XO ही भारतातील पहिली एसयूव्ही आहे ज्यामध्ये Dolby Vision आणि Dolby Atmos सह 16-स्पीकर Harman Kardon ऑडिओ सिस्टीम, ADAS Level 2 सह डायनॅमिक व्हिज्युअलायझेशन, तसेच Qualcomm Snapdragon 8155P चिपसेटवर आधारित ADRENOX+ प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे.
तंत्रज्ञान आणि कामगिरीवर भर
या एसयूव्हीमध्ये 2.0L mStallion TGDi पेट्रोल आणि 2.2L mHawk टर्बो डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध असून, डिझेल व्हेरियंटमध्ये All-Wheel Drive (AWD) देण्यात आले आहे. पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंटमध्ये 0–60 किमी/ता वेग 5 सेकंदांपेक्षा कमी वेळेत गाठण्याचा दावा कंपनीने केला आहे.
सुरक्षितता आणि लक्झरी
XUV 7XO मध्ये 120 पेक्षा अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये, त्यापैकी 75 वैशिष्ट्ये स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आली आहेत. 5-स्टार भारत NCAP रेटिंग लक्षात घेऊन ही SUV डिझाइन करण्यात आली असून, 7 एअरबॅग्ज, 540-डिग्री कॅमेरा, ड्रायव्हर ड्राऊजीनेस अलर्ट आणि लेव्हल-2 ADAS यांचा समावेश आहे.
महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह व्यवसायाचे अध्यक्ष आर. वेलुसामी यांनी सांगितले की, XUV 7XO ही राईड, प्रतिसाद आणि स्मार्ट अनुभव या तिन्ही बाबतीत पुढची पायरी आहे. ही एसयूव्ही महिंद्राच्या तंत्रज्ञान-केंद्रित दृष्टीकोनाचे प्रतीक आहे.तर मुख्य डिझाइन अधिकारी प्रताप बोस यांनी XUV 7XO ला “आयकॉनिक पण आधुनिक, आणि लक्झरी व मजबुती यांचा समतोल साधणारी एसयूव्ही असे संबोधले.
बाजारातील स्थान
XUV 7XO च्या माध्यमातून महिंद्राने वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला असून, वाढत्या तंत्रज्ञान-आधारित ग्राहक अपेक्षांना उत्तर देण्यावर कंपनीचा भर असल्याचे स्पष्ट होते.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी