माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन
पुणे, 06 जानेवारी (हिं.स.)पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज पहाटे ३ : ३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासूनआजारी होते कलमाडी निधनाने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.त्यांचे
Klamadi


पुणे, 06 जानेवारी (हिं.स.)पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज पहाटे ३ : ३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासूनआजारी होते कलमाडी निधनाने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.त्यांचे पार्थिव २ वाजेपर्यंत घरी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे,दुपारी ३.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुरेश कलमाडी यांनी पुण्यातील येथील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. १९६० मध्ये ते पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीत सामील झाले आणि १९६४ मध्ये ते जोधपूर आणि अलाहाबाद येथील हवाई दलाच्या फ्लाइंग कॉलेजमध्ये सामील झाले. १९६४ ते १९७२ पर्यंत त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली.ते भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष राहिले आहेत. ३ ते १४ ऑक्टोबर २०१० दरम्यान दिल्ली येथे झालेल्या नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष होते. ११ ऑक्टोबर २००८ रोजी, कलमाडी यांची पुण्यात चौथ्यांदा भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande