सोलापूर : श्रीक्षेत्र मार्डीत रविवारपासून श्री यमाईदेवी नवरात्रोत्सव
सोलापूर, 10 ऑक्टोबर (हिं.स.)। उत्तर सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्डी येथील श्री यमाईदेवी मंदिराचा शारदीय नवरात्रोत्सव रविवार, दि. ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. सुमारे ८१४ वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवात विविध धार्मिक विधी, नवचंडी होम आणि
fgdf


सोलापूर, 10 ऑक्टोबर (हिं.स.)। उत्तर सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्डी येथील श्री यमाईदेवी मंदिराचा शारदीय नवरात्रोत्सव रविवार, दि. ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. सुमारे ८१४ वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवात विविध धार्मिक विधी, नवचंडी होम आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी नवचंडी होम, तर मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त पालखी व सीमोल्लंघन सोहळा होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त व मुख्य पुजारी डॉ. रंगनाथ गुरव आणि ज्योतिषाचार्य रेणुकादास मोकाशी यांनी दिली.

कर्नाटक राज्यातील काळगी येथील निस्सीम देवीभक्त रंगनाथ स्वामी गोसावी (मोकाशी) यांनी माहूरगडावर बारा वर्षे तपश्चर्या केली. त्यानंतर बालाघाटाच्या पायथ्याशी असलेल्या आणि मार्कंडेय ऋषींची तपोभूमी मानल्या जाणाऱ्या मारोडी (सध्याचे मार्डी) या गावात देवीने त्यांना दर्शन दिले. त्यानंतर मूर्तीच्या रूपात देवी येथे स्थिरावली, अशी देवस्थानची आख्यायिका आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज पहाटे चार वाजता महापूजा, सकाळी साडेनऊ वाजता नित्यपूजा व अभिषेक, तर रात्री आठ वाजता शेजारती असे धार्मिक विधी केले जातात. रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या दिवशी मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, सांगोला, करमाळा आणि उत्तर सोलापूर तालुक्यांतील विविध गावांमधील शक्तीमंडळांचे कार्यकर्ते श्री यमाईदेवी मंदिरातून ज्योत घेऊन जातात.

सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता श्री रेणुकादेवी मंदिरात नवचंडी होम होईल. त्यानंतर सकाळी अकरा वाजता श्री यमाईदेवी मंदिरात नवचंडी होम होणार आहे. यानंतर अजाबळी व महापूजा होईल. सोमवारी सायंकाळी चार वाजता श्री यमाईदेवी मंदिरातील नवरात्रोत्सवाचा घटोत्थापन विधी पार पडेल, अशी माहिती ज्योतिषाचार्य रेणुकादास मोकाशी यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande