अमरावतीत नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल
अमरावती, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। शारदीया नवरात्रोत्सव आणि अंबादेवी यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनात बदल केले आहेत. अंबादेवी व एकवीरा देवी मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन 20 ऑक्टोबर रोजी रात
अमरावतीत नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल


अमरावती, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। शारदीया नवरात्रोत्सव आणि अंबादेवी यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनात बदल केले आहेत. अंबादेवी व एकवीरा देवी मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन 20 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

याकाळात शहरातील नऊ प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) संजय बताले यांनी केले आहे. अमरावती शहरात 11 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या काळात अंबादेवी व एकवीरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. भाविकांची सुरक्षितता, सार्वजनिक शांतता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठीहानिर्णय र्व घेण्यात आला आहे.

वाहतूक विभागाच्या अधिसूचनेनुसार राजकमल चौक ते अंबादेवी, साबनपुरा खिडकी ते गांधी चौक, ओसवाल भवन ते गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गांधी चौक, मुख्य पोस्ट ऑफिस रोड ते पंचशील लॉजिगमार्गे गांधी चौक आणि छत्रपती शिवाजी चौक ते गांधी चौक या मार्गांवर वाहतूक बंद राहील. याशिवाय नमुना परिसरातून अंबादेवी संस्थानकडे जाणारे सर्व लहान रस्ते, सक्करसाथ ते माणगावाजवळील जैन मंदिरापर्यंतचा मार्ग तसेच अंबादेवी ते औरंगपुरा भागातील मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरही निर्बंध राहतील.

जड वाहनांना प्रवेशबंदीटांगापाडा ते सावनपुरा पोलीस चौकीदरम्यानचा रस्ता अरुंद असल्याने या मार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मालवाहू आणि इतर वाहनांनी वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. पर्यायी मार्गामध्ये मालवाडा, मिट्टी बोल्डर, जुनी वस्ती, बडनेरा टी-पॉइंट, अकोला वाय-पॉइंट, सुपर हायवे, एमआयडीसी, दस्तूरनगर चौक आणि इर्विन चौक परिसरातील मार्गांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande