अमरावतीत नवरात्री उत्सवासाठी शहर, ग्रामीण पोलिसांचा तगडा बंदोबस्त
जिल्ह्यात 2583 मंडळात दुर्गादेवींची स्थापना अमरावती, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। शहर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांनी नवरात्री उत्सव, दुर्गा-शारदा देवीची स्थापना, गरबा, विसर्जन मिरवणूक आणि शोभायात्रा यासाठी शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरण सुनिश्चित
नवरात्री उत्सवासाठी शहर, ग्रामीण पोलिसांचा तगडा बंदोबस्त


जिल्ह्यात 2583 मंडळात दुर्गादेवींची स्थापना

अमरावती, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। शहर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांनी नवरात्री उत्सव, दुर्गा-शारदा देवीची स्थापना, गरबा, विसर्जन मिरवणूक आणि शोभायात्रा यासाठी शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले आहे. रविवार ११ ऑक्टोबर रोजी शहरासह जिल्ह्यात २,५८३ सार्वजनिक मंडळांमध्ये दुर्गादेवी व शारदा देवींची स्थापना करण्यात येणार आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अंदाजे ५८५ दुर्गा आणि शारदा मूर्तीची सार्वजनिक स्थापना केली जाईल. ६९ ठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रमही आयोजित केले जाईल.

सीपींच्या मार्गदर्शक सूचनासंवेदनशील भाग, प्रमुख चौक आणि विसर्जन मार्गांवर विशेष निगराणी ठेवली जाईल. सोशल मीडियावर अफवा पसरवणारे, चिथावणीखोर पोस्ट शेअर करणारे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. उत्सवादरम्यान शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सर्व देवी मंडळांना आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंडळांना ध्वनी प्रदूषण नियम, न्यायालयाचे निर्देश आणि प्रशासकीय अटींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात ११ ऑक्टोबरपासून नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल. या काळात ग्रामीण भागात १,७०९ दुर्गा मूर्ती आणि २८९ शारदा मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. आहे. यामध्ये ३९५ ठिकाणी 'एक गाव, एक दुर्गा' आणि ९६ ठिकाणी 'एक गाव, एक शारदा' या उपक्रमांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरक्षाव्यवस्थेचेनियोजन करण्यात आले आहे. उत्सवादरम्यान भीतीमुक्त आणि शांततापूर्ण वातावरण सुनिश्चित करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले जातील.

शहरात २,००० पेक्षा अधिक पोलीस तैनातनवरात्री उत्सवादरम्यान अमरावती शहरात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मोठे पोलीस दल तैनात केले जाईल. पोलीस व्यवस्थेमध्ये तीन पोलीस उपआयुक्त, चार पोलीस सहायक आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक, ७० पोलीस सहायक निरीक्षक न आणिउपनिरीक्षक आणि १,६५० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश न असेल. याव्यतिरिक्त, आरसीपी आणि क्यूआरटी पथके, एसआरपीएफची एक कंपनी आणि पुरुष व महिला होमगार्ड देखील तैनात केले जातील. संवेदनशील आणि मिश्र ड लोकवस्तीच्या भागांमध्ये, प्रमुख चौकांमध्ये आणि गर्दीच्या न ठिकाणी निश्चित नाके (फिक्स्ड पॉइंट्स) स्थापित केले जातील. नागरिकांच्या सुरक्षेसाठी १४ सीआर मोबाईल वाहने आणि महिलांच्या सुरक्षेसाठी १० दामिनी पथके तैनात केली जातील. बीट मार्शल आणि डायल ११२ वाहने शहरात सतत गस्त घालतील.

ग्रामीण भागात १,७०० पोलीस, एसआरपीएफग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यवस्थेमध्ये एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सात उपविभागीय पोलीस अधिकारी, २० पोलीस निरीक्षक, ११७ सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्यासह अंदाजे १,७०० पोलीस कर्मचारी असतील. याव्यतिरिक्त, तीनदंगल नियंत्रण पथके, एक क्यूआरटी, एसआरपीएफची एक कंपनी, ७०० पुरुष होमगार्ड आणि १८० महिला होमगार्ड तैनात केले जातील. उत्सवादरम्यान वाहतूक व्यवस्थापनासाठी वीस पोलीस कर्मचारीही तैनात केले जातील.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande