सोलापुरात १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान ‘शारदोत्सव २०२६’; मान्यवरांच्या वैचारिक-सांस्कृतिक मैफली रंगणार
सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। शहराच्या सांस्कृतिक आणि वैचारिक विश्वात चार दशकांहून अधिक काळ आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या ‘शारदोत्सव २०२६’चे आयोजन १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. पार्क चौकातील हु
fgdf


सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।

शहराच्या सांस्कृतिक आणि वैचारिक विश्वात चार दशकांहून अधिक काळ आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या ‘शारदोत्सव २०२६’चे आयोजन १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. पार्क चौकातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणाऱ्या या व्याख्यान व सांस्कृतिक महोत्सवात संगीत, कविता, गप्पा, हास्य, इतिहास आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनावरील चिंतनाची मेजवानी सोलापूरकरांना अनुभवता येणार आहे.

यंदाच्या शारदोत्सवात पाच दिवसांत पाच वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर रसिकांशी संवाद साधणार आहेत. प्रसिद्ध गायिका व संगीत अभ्यासक डॉ. मृदुला दाढे, कवी वैभव जोशी, प्रा. दीपक देशपांडे, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे आणि प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या कार्यक्रमांचा या महोत्सवात समावेश आहे.

सिद्धेश्वर बँकेचे संस्थापक आणि सहकार महर्षी कै. वि. गु. शिवदारे यांच्या दूरदृष्टीतून या व्याख्यानमालेची पायाभरणी झाली. त्यानंतर राजशेखर शिवदारे यांच्या मार्गदर्शनातून या उपक्रमाला सातत्य मिळाले. गेल्या चार दशकांपासून ‘शारदोत्सव’ हा सोलापूरच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. देशभरातील साहित्यिक, विचारवंत आणि विविध क्षेत्रांतील अभ्यासकांनी या व्यासपीठावरून सोलापूरकरांशी संवाद साधला आहे.

सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध गायिका आणि संगीत अभ्यासक डॉ. मृदुला दाढे यांच्या ‘सुरांच्या पाऊलखुणा’ या कार्यक्रमाने शारदोत्सवाची सुरुवात होणार आहे. ‘फिल्मी गीत-संगीताच्या प्रवासाची सुरेल सफर’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीताचा समृद्ध इतिहास उलगडला जाणार आहे.

विविध संगीतकारांच्या शैली, गीतकारांची शब्दकळा, गाण्यांच्या निर्मितीमागील रंजक संदर्भ आणि काळानुसार बदलत गेलेले चित्रपट संगीत यांचा अभ्यासपूर्ण वेध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. या कार्यक्रमात नीलेश निरगुडकर यांचाही सहभाग असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande