सोलापूर : उजनी जलाशयावरील चारही प्रस्तावित प्रकल्पांना आ. नारायण पाटील यांचा विरोध
सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। उजनी जलाशय आणि परिसरात प्रस्तावित असलेल्या चार मोठ्या प्रकल्पांना आमदार नारायण आबा पाटील यांनी विरोध दर्शविला आहे. तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, एआय डेटा सेंटर व कॅम्पस, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आणि स्मॉल मॉड्यूलर रिॲक्टर या
ujani dam news


सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। उजनी जलाशय आणि परिसरात प्रस्तावित असलेल्या चार मोठ्या प्रकल्पांना आमदार नारायण आबा पाटील यांनी विरोध दर्शविला आहे. तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, एआय डेटा सेंटर व कॅम्पस, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आणि स्मॉल मॉड्यूलर रिॲक्टर या प्रकल्पांबाबत त्यांनी हरकत नोंदविल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.

उजनी जलाशयावरील प्रस्तावित प्रकल्पांबाबत मागील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीसाठी विद्यमान आमदार नारायण पाटील यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप पाटील गटाकडून करण्यात आला आहे. संबंधित विभागाकडून बैठकीबाबत कोणताही ई-मेल किंवा दूरध्वनी आला नसल्याचेही तळेकर यांनी सांगितले.

प्रस्तावित प्रकल्पांची माहिती मिळाल्यानंतर आमदार नारायण पाटील यांनी तातडीने हरकत नोंदवून आपली भूमिका स्पष्ट केली, असे पाटील गटाकडून सांगण्यात आले. या प्रकल्पांना विरोध दर्शविणारे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पाठविण्यात आले आहे. उजनी जलाशय आणि परिसरातील या प्रस्तावित प्रकल्पांबाबत आमदार पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली असून, आता राज्य सरकार आणि संबंधित विभाग यावर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande