विवृति ॲसेट मॅनेजमेंटची व्हिंटेज II फंड्समधून यशस्वी एक्झिटची नोंद; 3,400 कोटी रु. चा परतावा
मुंबई, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतातील आघाडीच्या प्रायव्हेट क्रेडिट ॲसेट मॅनेजर्सपैकी एक असलेल्या विवृति ॲसेट मॅनेजमेंट (VAM) ने आपल्या व्हिंटेज II फंड्सचा (तीन कामगिरी करणाऱ्या क्रेडिट योजनांचा समावेश) निर्धारित फंड कालावधीत फंडची उद्दिष्टे पूर्ण
विवृती


मुंबई, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतातील आघाडीच्या प्रायव्हेट क्रेडिट ॲसेट मॅनेजर्सपैकी एक असलेल्या विवृति ॲसेट मॅनेजमेंट (VAM) ने आपल्या व्हिंटेज II फंड्सचा (तीन कामगिरी करणाऱ्या क्रेडिट योजनांचा समावेश) निर्धारित फंड कालावधीत फंडची उद्दिष्टे पूर्ण करत यशस्वीपणे समारोप आणि निर्गमन अर्थात एक्झिट केल्याची घोषणा केली.

यासह, VAM ने फंड्सच्या 2 व्हिंटेजेसमधून भांडवल परतावा आणि उत्पन्न वितरणाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना 3,400 कोटी रु. पेक्षा अधिक रक्कम परत केली आहे. या फंड्सचा संपूर्ण कार्यकाल व्यवसायाचे बदलते वातावरण, धोरणात्मक व्याजदर, तरलता आणि भू-राजकीय परिस्थितीमध्ये विविध प्रकारचे बदल होत असलेल्या कालखंडातून गेले.

व्हिंटेज II फंड्स

व्हिंटेज II फंड्स 2022 च्या सुरुवातीला सादर करण्यात आले आणि सर्व भांडवली वचनबद्धता प्राप्त केल्यानंतर सप्टेंबर 2023 पर्यंत त्यांचा अंतिम क्लोज जाहीर करण्यात आला. या फंडमधील गुंतवणूकदारांमध्ये संस्था (विमा कंपन्या, AIFIs) आणि खासगी गुंतवणूकदार (फॅमिली ऑफिसेस, HNIs) यांचा समावेश आहे.

विविध व्हिंटेजेसमध्ये VAM ने पारंपरिक आणि मध्यम जोखीम प्रोफाइल असलेल्या योजना सादर केल्या आहेत. आपल्या व्हिंटेज II धोरणांतर्गत VAM ने गुंतवणूकदारांकडून 1,700 कोटी रु. ची भांडवली वचनबद्धता उभारली आणि या फंड्सच्या संपूर्ण कालावधीत 45 हून अधिक पोर्टफोलिओ कंपन्यांमध्ये 3,500 कोटी रु. पेक्षा अधिक गुंतवणूक केली.

या फंडमधील गुंतवणूकप्राप्त कंपन्या पायाभूत सुविधा (रस्ते, बंदरे, विमानतळे, डिजिटल), स्वच्छ ऊर्जा, उत्पादन (खते, इलेक्ट्रॉनिक उपकरणे) आणि सेवा (लॉजिस्टिक्स, को-वर्किंग, वित्तीय सेवा, एंटरप्राइज SaaS) यांसारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.

व्हिंटेज II फंड्सनी एकत्रितपणे गुंतवणूकदारांना भांडवल आणि उत्पन्नाच्या स्वरूपात 2,260 कोटी रु. पेक्षा अधिक रक्कम परत केली. मध्यम जोखीम योजनेने सुमारे 15% चा सकल IRR नोंदवला, तर पारंपरिक योजनेने (जी केवळ ‘A’ श्रेणीमध्ये रेटिंग असलेल्या पोर्टफोलिओ कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते) सुमारे 12% चा एकूण IRR मिळवला. शुल्क आणि खर्च वजा केल्यानंतर, सर्व गुंतवणूकदारांना एकत्रितपणे मिळालेला परतावा मध्यम जोखीम योजनेसाठी सुमारे 13%, तर पारंपरिक योजनेसाठी सुमारे 10.5% होता.

एक्झिटबाबत बोलताना विवृति ॲसेट मॅनेजमेंटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विनीत सुकुमार म्हणाले: “प्रायव्हेट क्रेडिट हे पारंपरिक बँक कर्ज आणि इक्विटी भांडवलाच्या मधील वित्तपुरवठ्याची गरज अधिकाधिक प्रमाणात पूर्ण करत आहे. अनेक मूलभूतदृष्ट्या सक्षम आणि रोख प्रवाह निर्माण करणारे व्यवसाय आहेत, ज्यांना पारंपरिक कर्ज रचनांमधून उपलब्ध होऊ शकणाऱ्या भांडवलापेक्षा अधिक लवचिक भांडवलाची आवश्यकता असते. त्यामुळे जोखीम कमी करण्यासाठी संरक्षणात्मक उपाययोजना समाविष्ट करत मजबूत रोख प्रवाहाच्या आधारे परतावा समर्थित असेल अशा पद्धतीने व्यवहारांची रचना करणे हा आमचा दृष्टिकोन आहे. योग्य सुरक्षा तसेच विविध क्षेत्रे आणि व्यवसायांमध्ये विविधीकरणाच्या माध्यमातून जोखीम कमी करण्याचे संरक्षण अंतर्भूत करण्यात आले आहे.”

विवृति ॲसेट मॅनेजमेंटचे मुख्य गुंतवणूक अधिकारी सौमेंद्र घोष म्हणाले: “या फंडमधून करण्यात आलेला भांडवली परतावा आणि मिळालेले मजबूत परिणाम हे गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये क्रेडिटच्या भूमिकेचे, तसेच या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक न केल्याची संधी-हानी किती असू शकते याचे समर्थन करतात. गेल्या 7 वर्षांत 2 फंड व्हिंटेजेसमधून गुंतवणूकदारांना अपेक्षेप्रमाणे 3,400 कोटी रु. परत करण्यात आले आहेत. या फंड्सनी ॲसेट क्लासकडून अपेक्षित असलेले स्थिर उत्पन्न, भांडवलाचा आणि भांडवलावरील परताव्याचा अंदाजे करता येण्याजोगा प्रवाह आणि कमी अस्थिरतेसह असे परिणाम प्रत्यक्षात साध्य करून दाखवले आहेत. त्याचप्रमाणे, गुंतवणूकप्राप्त कंपन्यांसाठी लवचिक भांडवली उपाययोजनांद्वारे आम्ही सोडवलेल्या व्यावसायिक समस्याही या परिणामांमध्ये तितक्याच महत्त्वाच्या आहेत.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande